Wai Accident – मेणवलीत भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी, आसरे ग्रामस्थांच आर्थिक मदतीच आवाहन

वाईमधील (Wai Accident ) मेणवली येथे भीषण अपघात झाल्याने आसरे गावचे रहिवासी जगन्नाथ सणस यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करणारे साहेबराव सणस हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताने वाई तालुका हादरला असून आसरे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसरे गावातील पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी … Read more

Wai Vishesh – धोम धरणात लवकरच ‘सी प्लेन’ सेवा सुरू होणार! स्थानिकांना कसा होणार फायदा? वाचा…

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सातारा जिल्ह्यातील वाई (Wai Vishesh) तालुक्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने धोम धरणात “सी प्लेन” सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दिला आहे. केंद्र सरकारच्या “उडान 5.5” या योजनेअंतर्गत ही “सी प्लेन” सेवा सुरू होणार आहे. वाई तालुक्याला चहुबाजूंनी डोंगरागांनी वेढलेलं आहे. त्याचबरोबर मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक दरवर्षी वाईला … Read more

Wai Accident – रात्री रिक्षा ओढ्यात कोसळली पण दुसऱ्या दिवशी माहिती पडलं, एकसरच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एकसरचे 37 वर्षीय रिक्षाचालक विशाल मुगुटराव कळंबे यांच ओढ्यात रिक्षा कोसळल्याने अपघाती निधन झालं आहे. वाईवरून एकसरला जात असताना सोमवारी (23 जून 2025) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना मंगळवारी (24 जून 2025) सकाळी लक्षात आली. जेव्हा काही नागरिकांनी रिक्षा ओढ्यात पडेलली … Read more

Black Wild Dog – साताऱ्यात आढळला दुर्मीळ काळा रानकुत्रा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झाले दर्शन; पाहा Video

फोटो - दिग्विजय पाटील

निसर्गाची मुक्त उधळन झालेल्या साताऱ्यात विविध प्राणी आणि पक्षांचा वावर आहे. दुर्मीळ पक्षांच्या प्रजाती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाहायला मिळतात. मात्र आता चक्क दुर्मीळ असा काळा रानकुत्रा (Black wild dog) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळून आला आहे. कराड तालुक्यातील दिग्विजय पाटील हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील एका गावामध्ये फिरण्यासाठी गेले असता त्यांना या दुर्मिळ काळ्या रानकुत्र्याचे दर्शन झाले. … Read more

Wai Vishesh – वयगांवच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध, स्वच्छ व थंड पाणी; दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या वाई (Wai Vishesh) तालुक्यातील वयगांव या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शुद्ध, स्वच्छ व थंडगार पिण्याचे पाणी मिळणार आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीचा मान ठेवत पुण्यातील दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शाळेला वॉटर प्युरिफायर देण्यात आला आहे.   पावसाळा सुरू झाला की दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची दाट शक्यता निर्माण होते. त्यामुळे एकूणच … Read more

Pandharpur Wari 2025 – गजर हरिनामाचा! श्री कृष्णामाई सांप्रदायिक भजन मंडळाची एकदिवसीय पायवारी

श्री कृष्णामाई सांप्रदायिक भजन मंडळाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त एकदिवसीय पायवारीचे आयोजन करण्यात आलं होतं. दैनंदिन कामाच्या व्यापातून उसंत घेत एक दिवस सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी मुंबईच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येने वारकरी पुणे ते सासवड पायवारीमध्ये सहभागी झाले.  लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या एकदिवसीय पायवारीमध्ये हिरिरीने सहभाग घेतला. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातून आलेल्या दिंडी क्रमांक 31 मध्ये … Read more

Satara Vishesh – साताऱ्यातील प्रसिद्ध कास तलाव ओव्हरफ्लो, पाण्याची चिंता मिटली! पाहा Video

साताऱ्यातील प्रसिद्ध आणि पर्यटकांच मुख्य आकर्षण असलेला जावळी तालुक्यातील कास तलाव (Kaas Lake) जून महिन्यातच ओव्हरफ्लो झाला आहे. त्याचबरोबर साताऱ्याला पाणी पुरवठा करणारे महादरे व हत्ती हे दोन्ही तलाव सुद्धा ओसंडून वाहत आहेत. कास तलावामध्ये अर्धा टीएमसी इतका पाणीसाठा असल्यामुळे सातारकारांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. साताऱ्यातील कास तलाव ओव्हरफ्लो!#satara #kaaslake #Maharashtra #medha pic.twitter.com/4zOVPAIGf2 — … Read more

Satara Vishesh – साताऱ्यातील पर्यटन स्थळांवर निर्बंध, 19 ऑगस्टपर्यंत राहणार बंद; कोणकोणत्या ठिकाणांचा आहे समावेश, वाचा…

पावसाळा सुरू झाला की निसर्गाच्या सानिध्यात भटकण्याची ओढ लागते. मुंबई आणि पुण्याहून साताऱ्यातील (Satara Vishesh ) वाई, पांचगणी आणि महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये सुद्धा पावसाळ्यात झपाट्याने वाढ होते. परंतु या अल्हाददायक वातावरणाचा आनंद घेताना दु:खद घटना सुद्धा घडतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पर्यटन स्थळे 20 जून पासून 19 ऑगस्टपर्यंत बंद … Read more

Wai Vishesh – सुरूर-वाई रस्ता 15 ऑगस्टपर्यंत बदं, पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार; परिपत्रक जारी

पावसाळ्यात मोठ्या संख्येने मुंबई आणि पुण्याहून येणारे पर्यटक सुरूर-वाईमार्गे (Wai Vishesh) पांचगणी आणि महाबळेश्वरला जातात. परंतु आता त्यांना वाईला जाण्यासाठी पर्याची मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. वाई-सुरूर मार्गावर रस्त्याचे आणि पुलाचे काम सुरू असल्यामुळे सुरुरहून वाईकडे जाणारी वाहतूक 15 ऑगस्टपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी तसे परिपत्रक जारी केलं आहे. Wai Satara – … Read more

Wai Farming – वाई तालुक्यात कोणकोणत्या फळंची लागवड करणं शक्य आहे! जाणून घ्या एका क्लिकवर…

सह्याद्रीच्या कुशीत आणि कृष्णामाईच्या तीरावर वसलेला वाई (Wai Farming ) तालुका. ऊस, भात, घेवडा, हळद, विविध प्रकारच्या भाज्या, स्ट्रॉबेरी, आंबा या पारंपरिक फळ भाज्यांच उत्पादन वाईमध्ये मोठ्या प्रमाणात केलं जात. नुकताच सफरचंद लागवडीचा प्रयोग सुद्धा वाईमध्ये यशस्वी झाला आहे. वाईला समशीतोष्ण हवामान, सुपीक माती आणि चागंल्या पावसाचा फायदा होतो. त्यामुळे शेतीसाठी आणि फळलागवडीसाठी त्याचा चांगला … Read more

error: Content is protected !!