Satara Gazetteer – सातारा गॅझेट म्हणजे काय? लागू झाल्यास कोणाला आणि कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार?

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यासह भारतात चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावरील उपोषण आणि भारताच्या आर्थिक राजधानीत मराठ्यांचा मुक्त संचार साऱ्या देशाने पाहिला. हक्काच्या आरक्षणासाठी मोठ्या संख्येने लोकं मुंबईत दाखल झाले होते. अखेर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या. या मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) आणि सातारा गॅझेट (Satara … Read more

Wai News – वाईच्या अभिजीत भोईटेंचा भीम पराक्रम; आफ्रिकेतील सर्वात उंच किलीमांजारो शिखर केले सर

वाई (Wai News) तालुक्यातील अभिजीत भोईटे यांनी प्रचंड मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर आफ्रिकेतील सर्वात उंच आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात उंच किलीमांजारो शिखर सर केलं आहे. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये सुरू झालेला प्रवास किलीमांजारो शिखरापर्यंत जाऊन स्थिरावला आहे. उणे 18 अंश सेल्सिअस तापमानातही अभिजीत यांची जिद्द गगनाला भिडणार होती. सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या अभिजीत उल्हास भोईटे … Read more

Wai News – ना डीजे, ना गुलाल, ना फटाके; वयगांवमध्ये पार पडला पर्यावरणपूरक विसर्जन सोहळा

लाडक्या गणरायाचा विसर्जन सोहळा मंगळवारी (02 सप्टेंबर 2025) सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भक्तीमय वातावरणात घरगुती गणपती बाप्पााला निरोप देण्यात आला. वाई (Wai News) तालुक्यात सुद्धा घरगुती गणपतींचे विसर्जन वाजत गाजत करण्यात आले. परंतु सध्या तालुक्यात चर्चा आहे ती वयगांव गावातील विसर्जन सोहळ्याची. कारण ध्वनीप्रदूषण, फटाक्यांचा धूर आणि गोंगाटाला वयगावकरांनी नकार दिला. फुलांची उधळणं … Read more

लेख – रूईच्या पानावर गौराई; वयगांव गावची ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक परंपरा

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<< महाराष्ट्रात साजरा होणारा प्रत्येक सण धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा केला जातो. सण फक्त साजराच केला जात नाही तर पूर्वापार सुरू असलेल्या परंपरा सुद्धा तितक्याच आवडीने जपल्या जातात आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जातात. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येक सणाची एक वेगळी ओळख आणि वैशिष्ट्य आहे. असाच आपल्या सर्वांचा लाडका सण म्हणजे गणेशोत्सव होय. घरोघरी … Read more

Wai Accident News – तालुक्यात दोन अपघातांमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू, कवठे गावातील एकाचा समावेश

एकीकडे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. तर दुसरीकडे वाई (Wai Accident News) तालुक्यात दोन अपघातांमध्ये दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वेळे आणि जोशीविहीर गावांच्या हद्दीत झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातात मृत्यू झालेला एक तरुण कवठे आणि एक तरुण … Read more

Mahabaleshwar Rain News – भिलारमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्रप्रमुखांच्या कार्यालयाची भिंत कोसळली

सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये धुवांधार पाऊस कोसळला आहे. याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वांनाच बसला आहे. तसेच सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने वाई, महाबळेश्वर, कराड, पाटण, सातारा आणि जावळी तालुक्यांमधील शाळांना बुधवार (20 ऑगस्ट 2025) आणि गुरुवार (21 ऑगस्ट 2025) सुट्टी जाहीर केली आहे. याच दरम्यान महाबळेश्वर (Mahabaleshwar Rain News) तालुक्यातीर … Read more

Wai Rain News – कृष्णा नदीचं रौद्ररूप, छोटा पूल पाण्याखाली; पाहा धडकी भरवणारा Video

Wai Rain News मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे बलकवडी आणि धोम धरण जवळपास 95 ते 98 टक्के भरलं आहे. त्यामुळे दोन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वाई शहरातील महागणपती मंदिरात पाणी गेलं असून कृष्णा नदीने गणपतीच्या चरणांना स्पर्श केलं आहे. तसेच अनेक मंदिरे पाण्यात गेली आहेत. छोटा पूल सुद्धा पाण्याखाली … Read more

Satara Rain Update – पाटणमध्ये NDRF च्या टीमने 11 माकडांना दिलं जीवदान; पाहा थरारक Video

सातारा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने धुवांधार बॅटींग केली आहे. त्यामुळे बऱ्याच गावांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क सुटला आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने याचा फटका नागरिकांसह वन्यप्राण्यांनासुद्धा बसला आहे. पाटण तालुक्यातील संगमनर धक्क्यावर 11 माकडे पुराच्या पाण्यात अडकली होती. यासाठी NDRF च्या टीमला पाचारण करण्यात आलं होत. पावासाने झोडपून काढल्यामुळे आणि कोयना … Read more

Satara Rain Update – सातारा जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’; वाई, महाबळेश्वर, जावळीसह सहा तालुक्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर

साताऱ्यामध्ये (Satara Rain Update) पावसाने धुमाकूळ घातला आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे धोम धरण, बलकवडी धरण आणि कोयना धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील वाई, पाटण, जावळी, महाबळेश्वर, सातारा व कराड तालुक्यातील सर्व शाळांना बुधवार (20 ऑगस्ट 2025) आणि … Read more

Koyna Dam Update – कोयना धरणाचे सहा वक्र धरवाजे 9 फुटापर्यंत उघडण्यात आले; 65, 600 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू, पाहा Video

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये धुवांधार पाऊस सुरू आहे. तसेच पुढील काही तास असाच पाऊस सुरू असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे कोयना धरणाची (Koyna Dam Update) पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे 9 फुटांपर्यंत उघडण्यात आले आहे. सध्या 65,600 क्सुयेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील … Read more

error: Content is protected !!