Wai News – धावलीमध्ये बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; Video आला समोर

वाई (Wai News) तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याचा वावर असल्याचे काही व्हिडीओ मागील काही दिवसांमध्ये व्हायरल झाले होते. अशातच आता धावली गावात एका व्हिलामध्ये घुसून बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भागात भितीचे वातवरण निर्माण झाले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना शुक्रवारी (10 ऑक्टोबर 2025) पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान घडली आहे. बिबट्याने व्हिलामध्ये घुसून पोमेरेनियन जातीच्या कुत्र्यावर हल्ला करत त्याचा फडशा पाडला. तसेच कुत्र्याला झबड्यात धरून गेटवरून उडी मारून बिबट्या जंगलाच्या दिशेने पसार झाला. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाला याची माहिती देण्यात आली आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!