Wai News – दीपावलीचे औचित्य साधत वयगांवमध्ये कन्या पूजन आणि दीपोत्सव कार्यक्रम, पाहा Video

ग्रामस्थ मंडळ वयगांव आणि ग्रामपंचायत वयगांवच्या संकल्पनेतून आणि गुरुदत्त कला क्रीडा मंडळाच्या सौजन्याने लक्ष्मीचं रुप असणाऱ्या लहान मुलींचे पाद्यपूजन आणि दीपोत्सव कार्यक्रम श्री गुरदत्त मंदिरात पार पडला. सर्व कन्यांचे औक्षण ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ श्री गुरुदत्त मंदिरामध्ये उपस्थित होते. मान्यवर आणि ग्रामस्थांच्या हस्ते कन्या पूजन पार पडल्यानंतर दीपोत्सव … Read more

Wai Premier League – पावसाचा व्यत्यय आणि नाणेफेकीचा कौल, ‘खोडियार माता 11’ संघ ठरला मंत्री चषकाचा मानकरी

वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील (आबा) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 22 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या कालावधीत वाई तालुक्यातील सर्वात मोठ्या वाई प्रीमियर लीगचे (Wai Premier League) आयोजन करण्यात आले होते. वाईतील द्रविड हायस्कूलच्या मैदानावर 16 संघांमध्ये विजेतेपद पटकावण्यासाठी तुंबळ लढाई पाहायला मिळाली. मात्र, अखेरच्या क्षणी पावसाने हिरमोड केल्याने नाणेफेकीच्या … Read more

Makarand Patil – अतिवृष्टीमध्ये 1 कोटींपेक्षा अधिक शेतकर्‍यांचे नुकसान; यावर्षी मी वाढदिवस साजरा करणार नाही – मंत्री मकरंद पाटील

वाई तालुक्यातील द्रविड हायस्कूलच्या मैदानावार निलेश भोसले आणि राजीव शिर्के यांच्या माध्यमातून “मंत्री चषक” वाई प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. वाई-खंडाळा-महाबेश्वर मतदारसंघाचे आमदार आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील (Makarand Patil) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. या स्पर्धेचा आज (26 ऑक्टोबर 2025) शेवटचा दिवस असून … Read more

Fort Making Competition – वयगांवमध्ये शिवस्मृतींना उजाळा देणारी भव्य दिव्य किल्ला बांधणी स्पर्धा

वाई तालुक्यातील वयगांव गावामध्ये श्री गुरुदत्त कला क्रीडा मंडळाच्या वतीने “किल्ला बांधणी स्पर्धा 2025” (Fort Making Competition) चे आयोजन करण्यात आले आहे. 18 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2025 या कालावधीत इच्छूक स्पर्धकांना स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामुळे स्पर्धकांना स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या कलाकृतीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याची सुवर्ण संधी आहे. विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात … Read more

Wai News – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, वाई तालुक्यात 10 हजार वृक्षांची लागवड; हरित वसंताचा उत्सव साजरा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वाई (Wai News) तालुक्यात विविध पर्यावरणपूरक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले जात आहे. वाईकर सुद्धा या उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. याच पार्श्वभुमीवर आता वाई तालुक्यात मंगळवारी (14 ऑक्टोबर 2025) दहा हजार वृक्षांची विक्रम लागवड करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीच्या सोबतीने गावोगावी हरित वसंताचा उत्सव साजरा करण्यात आला आहे.  तालुक्यातील 32 … Read more

Wai News – कोल्हापूर विभागीय शालेय स्केटिंग रोलबॉल स्पर्धा; ज्ञानदीप स्कुलच्या मुलांनी पटकावले उपविजेतेपद

कोल्हापूर विभागीय शालेय स्केटिंग रोलबॉल स्पर्धा हातकणंगले तालुक्यातील आदर्श गुरुकुल पेठवडगावमध्ये मंगळवारी (14 ऑक्टोबर 2025) पार पडली. या स्पर्धेत वाईच्या (Wai News) ज्ञानदीप स्कुल व ज्युनियर कॉलेजच्या मुलांना सातारा जिल्ह्याचे प्रितिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. या संधीच मुलांनी सोनं केलं आणि स्पर्धेत विभागीय उविजेतेपद पटकावले. विविध स्पर्धांमध्ये तालुका आणि जिल्हा स्तरावर ज्ञानदीप स्कूल व ज्युनियर कॉलेजची … Read more

Wai News – वयगांवमध्ये पार पडलं ‘महा आरोग्य शिबीर’, ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम

वाई (Wai News) तालुक्यातील वयगांव गावामध्ये “माझी वसुंधरा अभियान 6.0” अंतर्गत विविध सामाजिक आणि पर्यावरणपुरक उपक्रम राबवविले जात आहेत. गावाच्या विकासात ग्रामस्थांचा मोठा वाटा असतो, त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणं हे ग्रामपंचायतीचे सामाजिक कर्तव्य असते. याच अनुषंगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत … Read more

Wai Ganpati Mandir- ढोल्या गणपतीचा इतिहास काय आहे? मंदिर कोणी बांधल? वाचा…

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<< संत वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावर वाई हे ऐतिहासिक शहर सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी “दक्षिणेची काशी” म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. इतिहासाच्या पानावर वाईचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यात आलं आहे. याच वाईमध्ये छोठीमोठी अशी शंभराहून अधिक प्राचीन मंदिरे (Wai Ganpati Mandir) आहेत. या सर्व मंदिरांमध्ये … Read more

Wai News – धावलीमध्ये बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; Video आला समोर

वाई (Wai News) तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याचा वावर असल्याचे काही व्हिडीओ मागील काही दिवसांमध्ये व्हायरल झाले होते. अशातच आता धावली गावात एका व्हिलामध्ये घुसून बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भागात भितीचे वातवरण निर्माण झाले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना शुक्रवारी (10 ऑक्टोबर 2025) … Read more

Wai News – ‘एक विवाह, एक झाड’; बावधन ग्रामपंचायतीचा पर्यावरणपूरक निर्णय, विवाह नोंदणीसाठी वृक्षारोपण बंधनकारक

माझी वसुंधरा 6.0 अभियानांतर्गत वाई तालुक्यातील (Wai News) बावधन ग्रामपंचायतीने विवाह नोंदणीसाठी वृक्षारोपण बंधनकारक करण्याचा पर्यावरणपूरक निर्णय घेत एक आदर्श निर्माण केला आहे. ग्रामपंचायत सदस्य संदीप पिसाळ यांनी मांडलेल्या ठरावाला ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत एकमताने मंजूरी देण्यात आली. फक्त झाडं लावणे नाही, तर झाडाची काळजी घेणे आणि झाडाचे संगोपन करणे सुद्धा बंधनकारक करण्यात आले आहे. गावामध्ये … Read more

error: Content is protected !!