वाई (Wai News) तालुक्यातील वेलंग गावाच्या हद्दीमध्ये बिबट्या आढळून आल्याने खळबल उडाली आहे. सोमवारी (18 डिसेंबर 2025) सायंकाळी 6.15 च्या सुमारास सणसवाडी येथील डोंगर परिसरात बिबट्या मुक्त संचार करताना आढळून आला. गेल्या काही दिवसांमध्ये वाई, पांचगणी आणि महाबळेश्वरमध्ये नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले असून बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने नागरिक घाबरून गेले आहेत.
वाई तालुका आणि परिसरात बिबट्या वारंवार दिसत आहे. पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना देखील अलीकडच्या काळात घडल्या आहेत. अशी परिस्थिती असताना वनविभाग व प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांना संध्याकाळनंतर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. जनावरांना चरण्यासाठी घेऊन जाताना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. पिंजरे लावणे, गस्त वाढवणे तसेच नागरिकांना सतर्कतेबाबत मार्गदर्शन करणे या उपाययोजनांसह प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हालचाल करावी, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
वाई तालुक्यातल्या वेलंग गावात सायंकाळी 6.15 च्या सुमारास सणसवाडी येथील डोंगरावर बिबट्या आढळला. गेल्या काही दिवसांमध्ये वाई, पांचगणी, महाबळेश्वरमध्ये नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालंय. तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. pic.twitter.com/JYuM0oLUjG
— Saamana Online (@SaamanaOnline) December 18, 2025
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.