लेख – एक गाव – एक संघ! अंतिम फेऱ्यांचा बादशाह वयगांव; सलग 8 स्पर्धांमध्ये विजयी गुलाल

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<< “आमची ऐकी हेच आमचं बळ” ही केवळ घोषणा नाही, तर प्रत्येक वयगांवकराच्या मनात बसलेली भावना आहे. मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये राहून, वेगवेगळ्या भागात नोकरी, व्यवसाय, शिक्षण करत असूनही जेव्हा क्रिकेटचा विषय येतो, तेव्हा सगळे मतभेद बाजूला ठेवून मुलं एकत्र येतात आणि वयगांवचा झेंडा उंचावण्यासाठी जिद्दीने मैदानात उतरतात. या एकीमुळेच आज वयगांव संघ … Read more

Tennis Cricket News – जन्नी कुंभळजाई चषक 2026 दिमाखात; वयगांव 11 चा विजयी जल्लोष, बोरगाव बुद्रुक उपविजेता

जगदंब स्पोर्ट्स, जोर आणि ग्रामस्थ मंडळ जोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जन्नी कुंभळजाई चषक जोर-२०२६ ही भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा (Tennis Cricket News) नवी मुंबईतील घणसोली येथे उत्साह, जल्लोष आणि क्रीडामय वातावरणात पार पडली. स्पर्धेच्या निमित्ताने जोर परिसरातील तसेच बाहेरील अनेक संघ एकत्र आले आणि प्रेक्षकांना थरारक सामने पाहायला मिळाले. अंतिम सामन्यात उत्कृष्ट संघभावना, शिस्तबद्ध … Read more

Wai News – मुंबईत अवतरणार बोरगांव! क्रिकेटच्या मैदानावर गावपणाचा जिव्हाळा; ‘बोरगांव प्रीमियर लीग पर्व 3’चा रणसंग्राम

धावपळीच्या, स्वप्नांच्या आणि संघर्षांच्या या जगात शिक्षणामुळे किंवा कामानिमित्त गावापासून लांब शहरांमध्ये येऊन रहाव लागतं. गाव दुरावलं असलं तरी मुंबई-पुण्यात राहूनही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आपलं गाव (Wai News) सतत आठवत असतं. ती गावाप्रती असणारी ओढ कधी कमी होत नाही. पण जेव्हा मुंबईसारख्या महानगरात संपूर्ण गाव एकत्र येतं, तेव्हा काही काळासाठी मनातली मुंबई नाहीशी होते आणि … Read more

सामना पाहायला आला आणि नशीब फळफळलं; एका हातात झेल घेताच चाहता झाला कोट्याधीश! पाहा Video

स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असतो. टी20 क्रिकेटची फटकेबाजी स्टेडियममध्ये जाऊन अनुभवण्यासाठी चाहत्यांची लगबग पाहायला मिळते. असाच उत्साह SA T20 लीगमध्ये पाहायला मिळत आहे. एमआय कॅपटाऊन आणि डर्बन सुपय जायंट्स हा सामना पाहण्यासाठी आलेला एक चाहता एका झेलमुळे कोट्याधीश झाला आहे. जवळपास 1.8 कोटी … Read more

IPL 2026 – बारामुल्लाच्या डेल स्टेनला खरेदी करण्यासाठी बोलीयुद्ध! पठ्ठ्या लखपती नव्हे करोडपती झाला, ‘या’ संघाने मारली बाजी

IPL 2026 ची मिनी लिलाव प्रक्रिया अबु धाबीमध्ये सुरू आहे. या लिलाव प्रक्रियेत देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर तगडी बोली लावली जात आहे. जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज आणि बारामुल्लाचा डेल स्टेन म्हणून प्रचलित असणारा औकिब दार याला लॉटरी लागली आहे. 30 लाख रुपयांच्या बेस प्राईजपासून बोली सुरू झाली आणि दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी त्याला … Read more

IPL 2026 – 19 आणि 20 वर्षांच्या खेळाडूला घेण्यासाठी चढाओढ, कोणत्या संघाने मारली बाजी? किती लागली बोली?

IPL 2026 चे बिगुल वाजले आहे. आबू धाबीमध्ये मिनी लिलाव प्रक्रियेमध्ये खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी संघांची चढाओढ पाहायला मिळत आहे. परदेशी खेळाडूंपेक्षा देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुरळा करणाऱ्या खेळाडूंना घेण्यासाठी संघ मालकांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. याच दरम्यान चेन्नई सुपर किंग्जने 20 वर्षीय प्रशांत वीर आणि 19 वर्षीय कार्तिक शर्मा या खेळाडूवर पैशांचा पाऊस पाडला आहे. प्रशांत … Read more

IND Vs SA Test – सायमन हार्मरचा टीम इंडियाला दणका! सामना फिरवला आणि दक्षिण आफ्रिका 30 धावांनी विजयी

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. प्रथम टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धारधार गोलंदाजी केली, तर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही त्याच तोडीची गोलंदाजी करत यजमानांची दाणादाण उडवली. दोन्ही संघांना एकाही डावात 200 चा आकडा पार करता आला नाही. लो स्कोरींग झालेल्या या यामन्यात अखेरच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेने 30 धावांनी … Read more

Video – बुम बुम बुमराह… असा काही चेंडू टाकला की फलंदाजही अवाक् झाला

कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्सवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सध्या सामन्याचा तिसरा दिवस सुरू असून दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात 159 धावा केल्या तर प्रत्युत्तरात टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात 189 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावात 153 धावा केल्या त्यामुळे टीम इंडियाला जिंकण्यासाठी 7 षटकांचा … Read more

IND Vs SA First Test – 13 वर्षांनी पुनरावृत्ती! शुभमन गिलनेही तेच केलं जे महेंद्र सिंग धोनीने केलं होतं

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्सवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत यजमानांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. ही मालिका World Test Championship 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी मालिका महत्त्वाची आहे. दरम्यान, या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने … Read more

Sunny Fulmali Success Story – झोपडी ते सुवर्णपदक! वडील नंदीबैल घेऊन भविष्य सांगतात; मुलाने भारताची मान अभिमाने उंचावली

परिस्थितीला झुकवण्याची क्षमता ठेवणारे अनेक रत्न या महाराष्ट्राच्या मातीत घडले आणि आजही घडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांच्या पराक्रमाने महाराष्ट्राची माती पवित्र झाली आहे. याच पवित्र मातीमध्ये पुण्यातील 17 वर्षीय कुस्तीपटू सनी फुलमाळी (Sunny Fulmali Success Story) याने इतिहास घडवला आहे. रहायला घर नाही, वडील नंदीबैल घेऊन घरोघरी जात … Read more

error: Content is protected !!