Colgate keep India Smiling Scholarship Program for BDS Students 2023-24

पैशांच्या अभावामुळे डॉक्टर होण्याच स्वप्न पुर्ण करता न येणाऱ्या विध्यार्थ्यांची संख्या देशभरात मोठ्याप्रमाणात आहे. पण याच गुणवान विध्यार्थ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी कोलगेट किप इंडिया स्माईलिंग शिष्यवृत्ती कार्यक्रम (Colgate Scholarship) आहे. कोलगेट-पोमोलिव्ह (INDIA) लिमिटेड च्या माध्यमातून गुणवान आणि पात्र विध्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. Colgate Scholarship च्या माध्यमातून (Scholarship For Medical Students), मान्यताप्राप्त संस्थांमधील बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS) अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी कोणताही आर्थिक अढथळा येऊ नये यासाठी 75,000 रु. आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. फक्त आर्थिक सहाय्यच नाही तर, या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विध्यार्थ्याला आवश्यकतेनूसार मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Colgate Palmolive India Limited

कोलगेट-पोमोलिव्ह (इंडिया) लिमिटेड ही देशातीस ओरल केअर बाजारपेठेतील आघाडीची कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेतील ओरल केअर आणि पर्सनल केअरवर प्राथमिक लक्ष केंद्रीत करुन, कंपनी तिच्या नेतृत्वासाठी आणि शाश्वतता आणि सामुदायिक कल्याणासाठी नाविन्यपुर्ण प्रयत्नांसाठी ओळखली जाते. अलीकडे कंपनीने नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने कोलगेट ब्राईट स्माईल्स, ब्राईट फ्युचर्स प्रोग्रामद्वारे प्लास्टिक कचरा कमी करणे आणि पुनर्वापराला प्रोत्सोहान देणे, उत्पादन सुविधांमध्ये पाणी आणि उर्जेचे संरक्षण करणे आणि नागरीकांच्या तोंडी आरोग्य सुधारणे यामध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. 1970 च्या मधल्या काळात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. तेव्हापासून 171 दशलक्षहून अधिक मुलांच्या जीवनाला स्पर्श केला आहे.

Colgate keep India Smiling Scholarship Program for BDS Students 2023-24

पात्रता (Colgate Scholarship)

• फक्त भारतातील विध्यार्थ्यांसाठी
• सध्या बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS) अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात प्रवेश घेतलेले विध्यार्थी पात्र असणार आहेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने 12वी बोर्ड परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळवलेले असावेत.
• विध्यार्थ्याने मान्यताप्राप्त सरकारी किंवा खाजगी अंडरग्रेजुएट BDS संस्थेत नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
• वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे.

अपात्रता (Colgate Scholarship)

• भारताबाहेरील विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र.
• बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS) अभ्यासक्रमाला प्रेवश घेतलेला नसेल तर तर अपात्र
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने 12वी बोर्ड परीक्षेत 60 टक्के पेक्षा कमी गुण मिळवले असतील तर अपात्र.
• विध्यार्थ्याने मान्यातप्राप्त सरकारी किंवा खाजगी अंडरग्रेजुएट BDS संस्थेच नोंदणी केलेली नसेल तर अपात्र
• वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त असेल तर अपात्र.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत (Colgate Scholarship)

• ओळखीचा पुरावा (आधार कार्ड)
• विध्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
• उत्पन्नाचा पुरावा (Form 16A/सरकारी प्राधिकरणाने जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र/बीपीएल प्रमाणपत्र/पगार स्लिप इ.)
• ज्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला आहे त्याचा पुरावा (कॉलेजचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र इ.)
• चालू शैक्षणिक वर्षाच्या फीची पावती
• शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे बॅंक खाते तपशील (रद्द केलेला चेक/पासबुक प्रत)
• आधीच्या वर्गाची मार्कशीट किंवा ग्रेड कार्ड
• अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)

फायदा काय होणार
ज्या विध्यार्थ्याची या शिष्यवृत्तीसाठी निवड होईल त्या भाग्यवान विध्यार्थ्याला 75,000 रु आर्थिक सहाय्य देण्यात येईल.

हे लक्षात ठेवा
शिष्यवृत्ती निधी हा केवळ शैक्षणिक-संबंधित खर्च, ट्युशन फी, वसतिगृह फी, जेवण, इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, लॅपटॉप, पाठ्यपुस्तके, स्टेशनरी आणि ऑनलाईन शिक्षण सामग्री यासारख्या वस्तूंसाठी वापरण्यात यावा.

अर्ज करण्यासाठी अंतीम तारीख
31 जानेवारी 2024

अर्ज करण्यासाठी लिंक
Colgate Scholarship / Colgate keep India Smiling Scholarship Program for BDS Students 2023-24

Leave a comment