कृषी शिष्यवृत्ती / Corteva Agriscience Scholarship

कृषी क्षेत्रात पदव्युत्तर किंवा डॉक्टरेट अभ्यासक्रम करण्यासाठी (Agriculture Scholarship) आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. Corteva Agriscience शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ही संधी विध्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाली आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत, गृहविज्ञान, जैवतंत्रज्ञान, कीटकशास्त्र, प्रजनन इत्यादी विषयांमध्ये पदव्युत्तर किंवा पीएचडी प्रोग्रामच्या कोणत्याही वर्षात अभ्यास करणाऱ्या विध्यार्थीनींना त्यांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी 50,000 रु. ची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Corteva Agriscience India

Corteva ही जागतिक प्युअऱ-प्ले Agriculture कंपनी आहे. कृषी क्षेत्रातील काही महत्वाचे ब्रँड्स आणि तंत्रज्ञानाच्या साखळी वाढवुन चालना देण्यासाठी सुस्थितीत असल्याने, कंपनी शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी वचनबध्द आहे. कंपनीने हा शिष्यवृत्ती कार्यक्रम Corteva कंपनीच्या CSR उपक्रामाचा भाग म्हणुन सुरु केला आहे.

कोर्टेव्हा Agriscience शिष्यवृत्ती कार्यक्रम / Corteva Agriscience Scholarship

पात्रता (Scholarship For Agriculture Students)

• संपुर्ण भारतातील विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र.
• फक्त विध्यार्थीनीं या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.
• भारतीय कृषी संशोधन परिषदेने मान्यता दिलेल्या गृहविज्ञान, जैवतंत्रज्ञान, कीटकशास्त्र प्रजनन इत्यादी सारख्या प्रवाहातील पदव्युत्तर (MBA/M.Sc./M.Tech) किंवा पीएचडी अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिकणाऱ्या फक्त विध्यार्थीनी पात्र असणार आहेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्यीनीने फक्त सरकारी महाविध्यालयातच शिक्षण घेतले पाहिजे.

अपात्रता (Scholarship For Agriculture Students)

• भारताबाहेरील विध्यार्थी अपात्र
• विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत (फक्त विध्यार्थीनी)
• खाजगी महविध्याल्यात शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थीनी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणा आहेत.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत

• ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड)
• चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (प्रेवश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनोफाईड प्रमाणपत्र)
• शैक्षणिक-संबंधित खर्चाच्या शुल्क भरलेल्या पावत्या (शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, पुस्तके इ.)
• कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा जसे (ITR, पगाराच्या स्लिप, संबंधित सरकारी प्राधिकरणाचे उत्पन्न प्रमाणपत्र इ.)
• अर्जदाराचे बँक खाते तपशील
• अर्जदाराचे छायाचित्र

अर्ज करण्यासाठी अंतीम तारीख
30 डिसेंबर 2023

अर्ज करण्यासाठी लिंक
Corteva Agriscience Scholarship

कंपनीची अधीकृत वेबसाईट
Corteva.com

Leave a comment