Courses After 12th Arts; कलेची आवड असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी

कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर कलेच्या सोबतीने भविष्य घडवण्याची उत्तम संधी असते. जे विद्यार्थी हुशार नसतात ते कला (Arts) शाखा निवडतात, असा एक चुकीचा पायंडा समजात पडलेला आहे. हा चुकीचा पायंडा पुसून काढण्यासाठी Courses After 12th Arts हा ब्लॉग लिहण्यात आला आहे. विद्यार्थी अभ्यासात हुशार आहे का नाही, हे पाहण्यापेक्षा त्याच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कलेच्या सहाय्याने चांगल्या पगाराची नोकरी तर मिळेलच पण स्वत:ची आवड जोपासण्याचे समाधन सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळेल. त्यामुळे हा ब्लॉग विद्यार्थी आणि पालकांनी शेवटपर्यंत आवर्जून वाचला पाहिजे.

कला शाखेतून 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा ज्या विद्यार्थ्यांना कला शाखेतून पदवी उत्तीर्ण करायची आहे. अशा विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांव्यतिरीक्त व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची सुद्धा संधी असते. त्याची सविस्तर माहिती आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहोत.

1) BA in Humanities And Social Science

मानवता आणि सामाजिक विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने जगभरातील विविध समुदायांचा इतिहास, साहित्य आणि तत्वज्ञान यांची सखोल माहिती मिळते. विद्यार्थ्यांना भुतकाळाबद्दल सखोल माहिती मिळते त्यामुळे भविष्यात त्याचा काय परिणाम होऊ शकतो याचा अंदाज लावण्याची कला त्यांच्यामध्ये निर्माण होते.

BA in Humanities And Social Science यामध्ये पदवी पूर्ण करणारे विद्यार्थी भविष्यात अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करू शकतात. त्याचबरोबर वकील, पत्रकारिता, कंटेट रायटर, नागरी सेवा, मानव संसाधन व्यवस्थापक, संरक्षण सेवा, सल्लागार आणि थेरपिस्ट, हॉटेल व्यवस्थापक या सारख्या क्षेत्रांमध्ये करिअर करू शकतात.

2) BA in Arts (Fine/visual/Performing)

BA in Arts या कोर्समध्ये विविध प्रकार आहेत, जसे की Fine Arts (ललित कला), Visual Arts आणि Performing Arts या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रामुख्याने नृत्य आणि दिग्दर्शन, थिएटर आर्टीस्ट, फिल्म मेकिंग, चित्रकार, शिल्पकार, कला शिक्षक, डिजिटल आर्टीस्ट आणि संगीत या क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची संधी निर्माण होते.

3) Bachelor Of Design (in Animation)

अॅनिमेटर बनण्यासाठी या कोर्सला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. त्याचबरोबर विद्यार्थी 2D/3D अॅनिमेशन, ग्राफिक किंवा वेब डिझाइन, VFX, साउंड आणि व्हिडीओ एडिटटिंग, अॅनिमेशन फिल्म मेकिंग या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करू शकतात.या अभ्यासक्रमासाठी प्रामुख्याने UCEED, NIFT आणि NID यांच्यामार्फत प्रवेश परीक्षा घेतली जाते.

4) Bachelor Of Design (BDes)

ज्या विद्यार्थ्यांना डिझायनर व्हायचे आहे, तसेच डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये आपले करिअर करायचे आहे. अशा विद्यार्थ्यांनी Bachelor Of Design या कोर्सला प्रवेश घेतला पाहिजे. या पदवीपूर्व कोर्सला कला शाखे व्यतिरिक्त वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी सुद्धा प्रवेश घेऊ शकतात. विद्यार्थी फॅशन डिझाईन, कम्युनिकेशन डिझाईन, इंटिरियर डिझाईन तसेच इंडस्ट्रीयल आणि प्रोडक्ट डिझाईन या अभ्यासक्रमांमध्ये स्पेशलायझेशन करू शकतात.

5) Bachelor Of Science (in Hospitality And Travel)

ज्या विद्यार्थ्यांना ट्रॅव्हल आणि टुरिझम इंडस्ट्रीमध्ये आपले करिअर घडवायचे आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स निर्माण करण्यात आला आहे. या कोर्समध्ये मार्केटिंग, व्यवस्थापन, हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल, कस्टमर सर्व्हिस मॅनेजमेंट आणि हॉटेल मॅनेजमेंट सारख्या घटकांचा समावेश आहे. हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रामुख्याने फूड अँड बेव्हरेज मॅनेजेर,हाऊसकीपिंग मॅनेजर, शेफ, केबिन क्रू, ट्रॅव्हल आणि कोऑर्डिनेटर, फ्रंट ऑफिस मॅनेजर आणि हॉटेल मॅनेजर या सारख्या पदांवर काम करू शकता.

6) BA LLB (5 year)

कायद्याची आवड असणाऱ्या आणि या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी LLB प्रवेश घेतला पाहिजे. त्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते.

7) Bachelor Of Journalism And Mass Communication (BJMC)

लिखानाची आवड असणाऱ्या आणि पत्रकारीतेमध्ये आपले करिअर रू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाटी Bachelor Of Journalism And Mass Communication (BJMC) हा अभ्यासक्रम आहे.

8) Bachelor Of Mass Media (BMM)

मास कम्युनिकेशन आणि मिडिया इंडस्ट्रीमध्ये आपले करिअर घडवू इच्छिनारे विद्यार्थी कला शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यानंतर BMM ला प्रवेश घेऊ शकतात. BMM चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर लेखक, पत्रकार, फोटो जर्नलिसट, न्यूज रिपोर्टर, एडिटर इत्यादी पदांवर काम करण्याची संधी निर्माण होते.

9) BBA LLB (5 Year)

BBA LLB म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन आणि बॅचरल ऑफ लेजिस्टेटिव्ह लॉ ऑनर्स. या अभ्यासक्रमामध्ये व्यवसाय प्रशासन आणि कायदा यांचा एकत्रित अभ्यास करता येतो. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याने 12वी 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते.

10) Bachelor in Computer Application (IT And Software)

ज्या विद्यार्थ्यांना संगणक आणि संगणकाची भाषा एक्सप्लोर करण्यामध्ये स्वारस्य आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी Bachelor in Computer Application (IT And Software) हा अभ्यासक्रम आहे. BCA ही पदवी प्रामुख्याने संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञानातील बीटेक किंवा बीई पदवीच्या बरोबरीची आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याना 12वी मध्ये किमान 45 ते 55 टक्के गुण मिळाले पाहिजेत.

Leave a comment