Deepthi Jeevanji – लोकांनी हिनवलं, चिढवलं पण तीने हार मानली नाही, आपल्या नावाचा जगात डंका वाजवला; पण बऱ्याच जणांना माहितच नाही

Deepthi Jeevanji भारताच्या क्रीडा क्षेत्रातलं सध्या चर्चेत असलेलं पण बऱ्याच जणांना माहित नसलेलं नाव. Paris Paralympics मध्ये तिने महिलांच्या 400 मीटर टी20 फायनलमध्ये 55.82 सेकंदाची वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले होते. दीप्तीने पटाकवेलं हे कांस्यपदक साऱ्या देशाला प्रेरणा देणारं ठरलं. संपूर्ण भारतात तिच्या नावाची जोरदार चर्चा झाली. ज्या लोकांनी तिला तिच्या दिसण्यावरून वारंवार हिणवलं तेच लोकं तीचं कौतुक करण्यासाठी तेव्हा सरसावत होते. बौद्धिक अपंगत्वाने जन्म झाल्यामुळे तिच्या चेहऱ्याची रचना थोडी वेगळी होती. त्यामुळे लहान असताना तिला असंख्य अडचणींचा टोमण्यांचा सामना करावा लागला, परंतु तिच्या आई-वडीलांनी तिला वेळोवेळी पाठिंबा दिला. त्यामुळे दीप्ती नावाच्या वादळाची दखल घ्यावीच लागेल. तुम्हीही तिचा प्रवास आवर्जून वाचा.

जन्म झाला आणि टोमण्यांना सुरुवात झाली

दीप्तीचा जन्म जीवनजी यादवगिरी आणि धनलक्ष्मी या शेतमजुरांच्या एका सामान्य कुटुंबात 27 सप्टेंबर 2003 रोजी झाला. बौद्धिक अपंगत्वाचे निदान झाल्यानंतर, तिला अनेकदा क्रूर टोमण्यांचा मारा सहान करावा लागला. गावकऱ्यांकडून तिला “माकड” असे म्हटले जायचे, मुलं तिला वारंवार चिढवायची त्यामुळे ती अक्षरश: वैतागली होती. तिचं मन आई-वडीलांना सोडून जाण्यास उद्युक्त करायचं. तिचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत असले तरी (अगदी त्यांची अर्धा एकर जमीन विकूनही), तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यात असणाऱ्या कलेडा या छोट्याशा गावात तिसं संपूर्ण बालपण गेलं. 

दीप्तीचा जन्म झाला तेव्हा तिचे डोकं खूपच लहान होतं आणि तिचे ओठ आणि नाक इतरांपेक्षा किंचीत वेगळ्या स्वरुपाच होतं. त्यामुळे गावातील लोक तिला पिछी (मेंटर) कोठी (माकड) अस म्हणत भरपूर त्रास द्यायचे. त्यामुळे ती अस्वस्थ व्हायची आणि घरी येऊन रडायची. लोकांनी भरपूर त्रास दिला तसेच तिला आश्रमात पाठवा असं सुद्धा सांगीतलं, परंतु तिच्या आई-वडीलांना तिला कधीही एकटं पडू दिलं नाही.

अन् तीने भरारी घेतलीच

शाळेत नववीत असताना, तिच्या प्रतिभेने तिचे पीई शिक्षक आणि प्रशिक्षक एन. रमेश यांचे लक्ष वारंगल येथील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत वेधले. आर्थिक अडचणी असूनही आणि तिच्या पालकांना हैदराबादला जाण्यासाठी बस भाडे परवडत नव्हते. अशा परिस्थितीत प्रशिक्षक रमेश यांनी तिच्या प्रवासासाठी वैयक्तिकरित्या निधी दिला. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुलेला गोपीचंद यांच्या फाउंडेशनच्या पाठिंब्याने, दीप्तीला हैदराबाद इन्स्टिट्यूटमध्ये बौद्धिकदृष्ट्या अपंग म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले, ज्यामुळे पॅरा-अ‍ॅथलेटिक्ससाठी तिचे दरवाजे उघडले. त्यानंतर मात्र तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. 

गोल्डन माइलस्टोन्स

2022 आशियाई पॅरा गेम्स, हांग्झो: 400 मीटर टी20 मध्ये विक्रमी 56.69 सेकंदांसह सुवर्ण (खेळ आणि आशियाई रेकॉर्ड) .

2024 जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, कोबे: सुवर्ण आणि विश्वविक्रम – महिलांच्या 400 मीटर टी20 मध्ये 55.07 सेकंद, अमेरिकेच्या ब्रेना क्लार्कच्या विक्रमाला मागे टाकत.

2024 पॅरिस पॅरालिम्पिक: 400 मीटर टी20 मध्ये 55.82 सेकंदांसह कांस्यपदक, बौद्धिक दुर्बलता असलेल्या खेळाडूने भारताचे पहिले पॅरालिम्पिक पदक जिंकले.

ट्रॅकच्या पलीकडे विजयाची

दीप्तीच्या विजयामुळे तिच्या कुटुंबात झालेला बदल

  • तिच्या पदक बक्षीस रकमेतून (सुमारे ₹30 लाख), त्यांनी पूर्वी विकलेली शेती पुन्हा खरेदी केली.
  • तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत, तिला जानेवारी २०२५ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला.
  • तेलंगणा सरकारने मार्च २०२५ मध्ये तिच्यासाठी सरकारी नोकरी देखील मंजूर केली.

तिचा हा रोमांचकारी प्रवास इतरांपेक्षा वेगळा का आहे

दीप्तीचा प्रवास एका संघर्षाच्या ठिणगीतून निर्माण झाला आहे. तिचा प्रवास भारतातील प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. देशासाठी काहीतरी करण्याच स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी दिप्ती एक प्रेरणास्त्रोत आहे.