अवघ्या काही दिवसांनी सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच (Ganeshotsav) आगमन होणार आहे. 27 तारखेपासून गणरायाचा जयजयकार सुरू होईल, घरोघरी-मंडळांमध्ये आरत्यांचा आवाज घुमेल आणि त्याला साथ मिळेत ती भजनी मंडळांची. गणेशोत्सव काळात मंडळांमध्ये तसेच घरोघरी भजनाच्या कार्यक्रमांच आवर्जून आयोजन केलं जातं. मुंबईमध्ये सुद्धा भजनी मंडळांना आमंत्रित केलं जात. याच भजनी मंडळांसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून भजनाचे साहित्य खरेदी करण्यासाठी भजनी मंडळांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने या वर्षी प्रथमच गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी गणेश मंडळांसह राज्य सरकारने सुद्धा पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या या सरकारी अनुदानाचा लाभ राज्यातील भजनी मंडळांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी दिली आहे.
अनुदान मिळवण्यासाठी काय करायचं?
राज्यातील भजनी मंडळांना 23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे.
अर्ज https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर करता येणार आहे.
राज्यातील 1800 भजनी मंडळांना या अनुदानाचा लाभ मिळणार.