४.५ लाख रु शिष्यवृत्ती GSK स्कॉलर्स प्रोग्राम २०२३-२४ / GSK scholarship

GSK स्कॉलर्स प्रोग्राम २०२३-२४ / GSK scholarship

GSK स्कॉलर्स प्रोग्राम हा CSR चा उपक्रम आहे. आणि या उपक्रमा अंतर्गत ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स ली. ही कंपनी गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विध्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यावर लक्ष केंद्रित करायच काम करत आहे. या उपक्रमाच महत्वाच उद्दिष्ट देशाच्या कौशल्य-निर्मित उपक्रमाला पाठिंबा देणे आणि भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिती (STEM) शिक्षणाला चालना देणे आहे.
या GSK scholarship किंवा शिष्यवृत्ती अंतर्गत, सरकारी महाविध्यालयांमधून एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांना त्यांच्या एमबीबीएस प्रोग्रामसाठी होणारा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी ४.५ वर्षापर्यंत प्रती वर्ष १ लाख रु. पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

Scholarship for MBBS Students / GSK scholarship

पात्रता

•फक्त भारतातील विध्यार्थ्यांसाठी.
•सरकारी महाविध्यालयातून एमबीबीएस प्रोग्रामच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेणारे विध्यार्थी पात्र असणार आहेत.
•अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने बारावीच्या बोर्ड परीक्षेत किमान ६५ टक्के गुण प्राप्त केलेल असावेत.
•अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ६ लाख रु. पेक्षा कमी असावे.

आपत्रता

•भारता बाहेरील विध्यार्थी अपात्र असणार आहेत.
•खासगी महाविध्यालयातून एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेणारे विध्यार्थी अपात्र असणार आहे. (फक्त सरकारी महाविध्यालयाचे विध्यार्थी पात्र)
•अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने बारावीच्या बोर्ड परीक्षेत किमान ६५ टक्के पेक्षा कमी गुण प्राप्त केले असतील तर.
•अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ६ लाख रु. पेक्षा जास्त असेल तर.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत.

•इयत्ता १२ वी ची मार्कशीट
•सरकारने जाहीर केलेले ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायविंग लायसन्स/पॅन कार्ड)
•चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती/प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र)
•कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा (पगार स्लिप, फॉर्म १६, उत्पन्न प्रमाणपत्र, ITR)
•अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे बँकेचे तपशील
•अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.

फायदे

•एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यांसाठी, साडेचार वर्षासाठी ४.५ लाखांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल म्हणजेच प्रती वर्ष १ लाख रु. शिष्यवृत्ती रक्कम दिली जाईल.

हे लक्षात ठेवा.

•GSK scholarship किंवा शिष्यवृत्तीचा निधी केवळ शैक्षणिक खर्चासाठी वापरला जाऊ शकतो ज्यात शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, पुस्तके, वसतिगृह शुल्क, भोजन आणि सेमिनार यांचा समावेश आहे. तरीही यातून काही निधी अजूनही शिल्लक राहिला तर तो निधी स्टेशनरी, ऑनलाइन शिक्षण आणि इंटरनेट/डेटा पॅक बिल भरण्यासाठी वापरला जाईल.

अर्ज कसा करावा

अर्ज करण्यासाठी पुढील लिंक तुम्ही ओपन करू शकता GSK scholarship किंवा buddy4study.com

अर्ज करण्याची अंतिम मुदत
१० ऑक्टोंबर २०२३

Leave a comment