दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी/ट्रान्सजेंडर विध्यार्थ्यांसाठी /रोजंदारीवर काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी/अनाथ आणि एकल पालक असणाऱ्या मुलांसाठी/खेळाडूंसाठी ज्योति प्रकाश शिष्यवृत्ती

ज्योती प्रकाश शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शन प्रोग्राम / Jyoti Prakash Scholarship

Buddy4Study India फाऊंडेशनच्या अंतर्गत अपंग विध्यार्थी, ट्रान्सजेंडर विध्यार्थी, अनाथ, एकल-पालक असणारी मुले आणि खेळाडू यांना त्यांच्या शैक्षणिक किंवा क्रीडा खर्च भागवण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी हा ज्योति प्रकाश शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शन कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत, जे विध्यार्थी सध्या इयत्ता ९ वी ते १२ वी., पदवी किंवा पदव्यूत्तर अभ्यासक्रमात शिकत आहेत तसेच खेळाडूंचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी २४,००० रु पर्यंत शिष्यवृत्ती लाभ मिळणार आहे.

ट्रान्सजेंडर विध्यार्थ्यांसाठी ज्योती प्रकाश शिष्यवृत्ती / Jyoti Prakash Scholarship

पात्रता

• फक्त भारतातील विध्यार्थ्यांसाठी.
• ट्रान्सजेंडर विध्यार्थी जे इयत्ता ९ वी ते १२ वी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत ते पात्र असतील.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने मागील पात्रता परीक्षेत किमान ५५ टक्के गुण प्राप्त केलेले असावेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा कमी असावे.

अपात्रता

• भारता बाहेरील विध्यार्थी अपात्र.
• ट्रान्सजेंडर विध्यार्थी जे इयत्ता ९ वी ते १२ वी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत नसतील ते अपात्र.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने मागील पात्रता परीक्षेत ५५ टक्के पेक्षा कमी गुण मिळाले असतील ते विध्यार्थी अपात्र.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा जास्त असेल तर अपात्र.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत.

• ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र
• आधार कार्ड
• मागील पात्रता परीक्षेची मार्कशीट
• कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म१६/सक्षम अधिकार्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र/पालकांच्या पगाराच्या स्लिप्स).
• पासपोर्ट आकाराचा अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचा फोटो.
• चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाचा पुरावा (शाळा/महाविध्यालयाने जारी केलेले प्रवेश पत्र किंवा बोनाफाईड पत्र)
• चालू शैक्षणिक वर्षाची शाळा/कॉलेज/विध्यापीठ फीची पावती.

फायदे

• इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विध्यार्थ्यांसाठी १५ हजार रु.
• पदवीधर विध्यार्थ्यांसाठी १८ हजार रु.
• पदव्युत्तर विध्यार्थ्यांसाठी २४ हजार रु.

दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी ज्योती प्रकाश शिष्यवृत्ती / Jyoti Prakash Scholarship

पात्रता

• फक्त भारतातील विध्यार्थ्यांसाठी.
• अर्ज करणारा विध्यार्थी जे इयत्ता ९ वी ते १२ वी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत ते पात्र असतील.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने मागील पात्रता परीक्षेत किमान ५५ टक्के गुण प्राप्त केलेले असावेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा कमी असावे.
• ४० टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असलेले विध्यार्थी.

अपात्रता

• भारता बाहेरील विध्यार्थी अपात्र.
• अर्ज करणारा विध्यार्थी जे इयत्ता ९ वी ते १२ वी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत नसतील ते अपात्र.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने मागील पात्रता परीक्षेत ५५ टक्के पेक्षा कमी गुण मिळाले असतील ते विध्यार्थी अपात्र.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा जास्त असेल तर अपात्र.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत ?

• अपंगत्व प्रमाणपत्र
• आधार कार्ड
• मागील पात्रता परीक्षेची मार्कशीट
• कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म१६/सक्षम अधिकार्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र/पालकांच्या पगाराच्या स्लिप्स).
• पासपोर्ट आकाराचा अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचा फोटो.
• चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाचा पुरावा (शाळा/महाविध्यालयाने जारी केलेले प्रवेश पत्र किंवा बोनाफाईड पत्र)
• चालू शैक्षणिक वर्षाची शाळा/कॉलेज/विध्यापीठ फीची पावती.

फायदे

• इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विध्यार्थ्यांसाठी १५ हजार रु.
• पदवीधर विध्यार्थ्यांसाठी १८ हजार रु.
• पदव्युत्तर विध्यार्थ्यांसाठी २४ हजार रु.

रोजंदारीवर काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी ज्योती प्रकाश शिष्यवृत्ती / Jyoti Prakash Scholarship

पात्रता

• ज्या विध्यार्थ्यांचे पालक पदवीधर नसतील आणि रोजंदारीवर काम करणारे, शेतकरी, चालक, माळी, प्लंबर, सुरक्षा रक्षक, इलेक्ट्रीशियन ई.
• फक्त भारतातील विध्यार्थ्यांसाठी.
• अर्ज करणारा विध्यार्थी जे इयत्ता ९ वी ते १२ वी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत ते पात्र असतील.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने मागील पात्रता परीक्षेत किमान ५५ टक्के गुण प्राप्त केलेले असावेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असावे.

अपात्रता

• भारता बाहेरील विध्यार्थी अपात्र.
• अर्ज करणारा विध्यार्थी जे इयत्ता ९ वी ते १२ वी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत नसतील ते अपात्र.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने मागील पात्रता परीक्षेत ५५ टक्के पेक्षा कमी गुण मिळाले असतील ते विध्यार्थी अपात्र.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा जास्त असेल तर अपात्र.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत ?

• असावी की त्यांचे मूल उच्च शिक्षण घेणारे कुटुंबातील पहिले आहे आणि पालकांपैकी कोणीही पदवीधर नाही.
• आधार कार्ड
• मागील पात्रता परीक्षेची मार्कशीट
• कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म१६/सक्षम अधिकार्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र/पालकांच्या पगाराच्या स्लिप्स).
• पासपोर्ट आकाराचा अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचा फोटो.
• चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाचा पुरावा (शाळा/महाविध्यालयाने जारी केलेले प्रवेश पत्र किंवा बोनाफाईड पत्र)
• चालू शैक्षणिक वर्षाची शाळा/कॉलेज/विध्यापीठ फीची पावती.

फायदे

• इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विध्यार्थ्यांसाठी १५ हजार रु.
• पदवीधर विध्यार्थ्यांसाठी १८ हजार रु.
• पदव्युत्तर विध्यार्थ्यांसाठी २४ हजार रु.

अनाथ आणि एकल पालक असणाऱ्या मुलांसाठी ज्योती प्रकाश शिष्यवृत्ती / Jyoti Prakash Scholarship

पात्रता

• ज्या विध्यार्थ्याचे पालक एक किंवा दोन्हीही गमावले आहेत.
• फक्त भारतातील विध्यार्थ्यांसाठी.
• अर्ज करणारा विध्यार्थी जे इयत्ता ९ वी ते १२ वी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत ते पात्र असतील.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने मागील पात्रता परीक्षेत किमान ५५ टक्के गुण प्राप्त केलेले असावेत.
• अर्ज करणाऱ्या एकल-पालक मुलांसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा कमी असावे. तर अनाथ मुलांसाठी, त्यांच्या पालकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असले पाहिजे

अपात्रता

• भारता बाहेरील विध्यार्थी अपात्र.
• अर्ज करणारा विध्यार्थी जे इयत्ता ९ वी ते १२ वी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत नसतील ते अपात्र.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने मागील पात्रता परीक्षेत ५५ टक्के पेक्षा कमी गुण मिळाले असतील ते विध्यार्थी अपात्र.
• अर्ज करणाऱ्या एकल-पालक मुलांसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा जास्त असेल तर. तसेच अनाथ मुलांसाठी, त्यांच्या पालकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा जास्त असेल तर.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत ?

• आधार कार्ड
• मागील पात्रता परीक्षेची मार्कशीट
• कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म१६/सक्षम अधिकार्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र/पालकांच्या पगाराच्या स्लिप्स).
• पासपोर्ट आकाराचा अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचा फोटो.
• चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाचा पुरावा (शाळा/महाविध्यालयाने जारी केलेले प्रवेश पत्र किंवा बोनाफाईड पत्र)
• चालू शैक्षणिक वर्षाची शाळा/कॉलेज/विध्यापीठ फीची पावती.
• पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास)

फायदे

• इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विध्यार्थ्यांसाठी १५ हजार रु.
• पदवीधर विध्यार्थ्यांसाठी १८ हजार रु.
• पदव्युत्तर विध्यार्थ्यांसाठी २४ हजार रु.

खेळाडूंसाठी ज्योती प्रकाश शिष्यवृत्ती / Jyoti Prakash Scholarship

पात्रता

• फक्त भारतातील विध्यार्थ्यांसाठी.
• मागील ३ वर्षात राज्य, राष्ट्रीय किंवा आंतराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेले खेळाडू.
• ३१ जुलै २०२३ रोजी अर्ज करणाऱ्या खेळाडूचे वय १४ ते २५ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
• अर्जदारांनी अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बुद्धीबळ, क्रिकेट, गोल्फ, हॉकी, टेबल टेनिस, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेनिस, बॉक्सिंग, तिरंदाजी, नेमबाजी इत्यादी खेळांमध्ये सहभाग असणे आवश्यक आहे.
• अर्ज करणाऱ्या खेळाडूचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा कमी असल पाहिजे.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत.

• वयाचा पुरावा (जन्मतारीख असलेले मॅट्रिकचे प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला/ नगरपालिका/ ग्रामपंचायत/ पासपोर्ट इत्यादींनी दिलेला जन्म प्रमाणपत्र.
• आधार कार्ड.
• पासपोर्ट आकाराचा फोटो.
• कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म१६/सक्षम अधिकार्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र/पालकांच्या पगाराच्या स्लिप्स).
• राज्य, राष्ट्रीय किंव आंतरराष्ट्रीय खेळांमधील सर्वोच्च आणि सर्वात अलीकडील सहभागाची स्कॅन केलेली प्रत – सहभाग/सिद्धी प्रमाणपत्र.

फायदे.

• १५ ते २५ हजार रु. पर्यंत शिष्यवृत्ती.

अर्ज करण्याची अंतिम मुदत
३ ऑक्टोंबर २०२३

अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – Jyoti Prakash Scholarship

Leave a comment