Indira Gandhi – भारताची आयर्न लेडी! इंदिरा गांधी यांच्या बद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान Indira Gandhi यांची झंझावाती कारकीर्द साऱ्या जगाला माहित आहे. अनेक ऐतिहासिक निर्णय इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना घेतले. तसेच काही वादग्रस्त निर्णयामुळे त्या काळात त्यांच्यावर बरीच टीका सुद्धा झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात इंदिरा गांधी यांच्या कुटुंबाचा सहभाग होता. त्यामुळे राजकीय वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता. भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची एकूलती एक मुलगी म्हणजे इंदिरा गांधी. 19 नोव्हेंबर 1917 रोजी कमला नेहरू यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. एक राजकारणी म्हणून इंदिरा गांधी यांचा जीवनप्रवास सर्वांना माहित असणं गरजेचे आहे. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यामुळे त्यांचे नाव आजही तितक्याच आदराने घेतले जाते. राष्ट्रीय काँग्रेसमधील प्रभावशाली नेते आणि वकील मोतीलाल नेहरू हे इंदिरा गांधी यांचे आजोबा. त्यामुळे राजकारण, शैक्षणिक आणि समाजकारणाचं बाळकडू त्यांना अगदी लहान वयातच मिळालं होतं.

इंदिरा गांधी प्रारंभिक जीवन | who is Indira Gandhi

इंदिरा गांधी यांच्या प्रारंभिक शिक्षणामध्ये अनेक वेळा अडथळा आला.  ब्रिटिस अधिकाऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांना अनेक वेळा तुरुंगात डांबून ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात बराच वेळा खंड पडला. मात्र, तरीही त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. सुरुवातीला दिल्लीतील मॉडर्न स्कूल, त्यानंतर अलाहबादमधील सेंट मेरिज कॉन्हेंट स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे पुढील शिक्षण स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथील इकोले इंटरनॅशनमध्ये पूर्ण केले. घरातून शिक्षणाचे बाळकडू मिळाल्यामुळे आणि राजकीय वारसा असल्यामुळे शाळेमध्ये त्यांना ज्या गोष्टी शिकयला मिळाल्या त्याहून अधिक गोष्टी त्यांना स्वातंत्र्यलढ्यामुळे शिकायला मिळाल्या. याच गोष्टीचा त्यांना भविष्यात चांगला फायदा झाला. त्या काळात अलाहाबादमधील आनंद भवन हे त्यांचे घर राजकीय हालचालींचे मुख्य केंद्र होते. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांचा त्यांना लहान असताना सहवास लाभला. तसेच त्यांचे मार्गदर्शनही मिळाले. त्याचबरोबर इंदिरा गांधी यांनी आपल्या किशोरवयात, वानर सेना (Monkey Brigade) स्थापन केली होती. ही एक लहान मुलांची ब्रिगेड होती, ज्याने स्वातंत्र्य चळवळीदरम्यान पॅम्प्लेट वाटणे आणि झेंडे बनवणे यासारख्या कामांमध्ये पुढाकार घेतला होता. त्यांच्या या कृतीमुळे त्यांना लहानपणापासूनच राजकारणात रस असल्याचे दिसून येते.

Ganpatrao Deshmukh – एसटीने प्रवास करणारा एकमेव आमदार, Guinness Book of World Record मध्ये आहे नोंद

इंदिरा गांधी यांनी पुढील शिक्षण पश्चिम बंगाल येथील रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतन, विश्व-भारती विद्यापीठ येथे घेतले. मात्र, आरोग्याच्या समस्या आणि राजकीय अस्वस्थतेमुळे त्या तिथे फार काळ थांबल्या नाहीत आणि शिक्षण अर्धवट सोडून माघारी परतल्या. त्यानंतर त्यांनी इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांवर लक्ष केंद्रित करून ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे शिक्षण घेतले. इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना जागतिक राजकारण आणि वसाहतविरोधी चळवळींचा परिचय झाला. इंदिरा गांधी यांनी 1942 साली कुटुंबाचा विरोध झुगारत फिरोज गांधी यांच्याशी लग्न केले. फिरोज गांधी एक फारशी पत्रकार होते. त्यांना राजीव गांधी आणि संजय गांधी ही दोन मुले झाली.

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

इंदिरा गांधी यांनी आपल्या राजकीय कारकि‍र्दीत भारताचे तीन वेळा (इ.स 1966-1977 आणि 1980-1984) पंतप्रधानपद भूषवले. इंदिरा गांधी भारताच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान असून त्यांचे नाव भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवले आहे. इंदिरा गांधी यांची राजकीय कारकीर्द बरीच वादग्रस्त ठरली होती. बऱ्याच वेळा त्यांच्यावर टीका सुद्धा करण्यात. आणीबाणीचा निर्णयामुळे इंदिरा गांधी यांचे नाव जगाच्या पटलावर चांगलेच चर्चेच होते. हरित क्रांतीचा निर्णयामुळे कृषी उत्पादकतेमध्ये लक्षणीय वाढ झाली आणि अन्नटंचाईचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्वांना मदत झाली होती. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. पाकिस्तानपासून बांगलादेशच्या स्वातंत्र्यांच्या युद्धात पाठिंबा देण्यासाठी इंदिरा गांधी यांची महत्त्वाची भूमिका होती. इंदिरा गांधी त्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयासाठी “भारताच्या आयर्न लेडी” म्हणून ओळखल्या जातात. 1972 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या अंगरक्षकाने त्यांची हत्या केली.

Top 10 Facts About Indira Gandhi

1 भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

इंदिरा गांधी 1966 मध्ये भारताच्या पंतप्रधान पदावर रुजू होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. त्यामुळे त्या भारताच्या इतिहासातील सर्वाच जास्त काळ काम करणाऱ्या पंतप्रधानांपैकी एक आहेत.

2 हरित क्रांती

इंदिरा गांधी सरकारने हरित क्रांती सारखा क्रांतिकारक निर्णय घेतला. त्यामुळे कृषी सुधारणांना वाव मिळाला आणि अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली. विशेषत: गहू आणि तांदूळ उत्पादनात चांगली वाढ झाल्याने भारत अन्न उत्पादनात स्वयंपूर्ण झाला.

3 बँकांचे राष्ट्रीयीकरण

1969 मध्ये, इंदिरा गांधींनी 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण केले जेणेकरून ग्रामीण आणि कमी सेवा असलेल्या भागात कर्जाची उपलब्धता सुनिश्चित केली जावी, ही भारताच्या आर्थिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.

4. बांगलादेश मुक्ती संग्राम (1971)

इंदिरा गाधी यांनी बांगलादेश मुक्ती संग्रामामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ज्यामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. भारताच्या निर्णायक लष्करी हस्तक्षेपामुळे इंदिरा गांधी यांचे नाव जागतिक राजकारणात गाजले.

5 सिमला करार (1972)

बांगलादेश युद्धानंतर, इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारवर स्वाक्षरी केली, ज्याचा उद्देश काश्मीरसह द्विपक्षीय मुद्द्यांवर शांततापूर्ण निराकरण करणे हा होता.

Pramod Mahajan – देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव; भावानेच केला खून, काय घडलं होतं तेव्हा?

6 आणीबाणी  (1975-1977)

इंदिरा गांधीं यांनी 1975 मध्ये आणीबाणी घोषित केली, नागरी स्वातंत्र्य निलंबित केले, प्रेस सेन्सॉर केले आणि राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकले. इंदिरा गांधी यांच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर टीका झाली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात वादग्रस्त निर्णयांपैकी एक निर्णय मानला जातो.

७. ऑपरेशन ब्लू स्टार (1984)

इंदिरा गांधी यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातून शीख अतिरेक्यांना हटवण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार राबवले. या निर्णयामुळे अनेक शीखांमध्ये संतापाची लाट उसळली. याच निर्णयामुळे त्यांची त्यांच्याच शीख अंगरक्षकाने हत्या केली होती.

८. पोखरण अणु चाचणी (1974)

इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली, भारताने राजस्थानमधील पोखरण येथे स्माइलिंग बुद्धा ही पहिली यशस्वी आण्विक चाचणी घेतली. यामुळे भारत एक अणु-सक्षम राष्ट्र म्हणून प्रस्थापित झाला.

९. “गरीबी हटाओ” नारा

इंदिरा गांधींनी 1971 च्या निवडणुकीदरम्यान “गरीबी हटाओ” (गरिबी हटवा) मोहिमेची सुरुवात केली. याचा उद्देश गरिबांसाठी सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केले गेले. 

१०. प्रादेशिक आणि जागतिक नेतृत्व

इंदिरा गांधींनी शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत युनियनशी संबंध संतुलित करून नॉन-अलाइन्ड मूव्हमेंट (NAM)मध्ये भारताला एक महत्त्वाचे स्थान दिले.