जावळी (Jaoli News) तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत आणि जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराच्या सानिध्यात वसलेल्या मोळेश्वर गावात श्री मोळेश्वर देवाची “तुळशी बार्शी यात्रा 2025” मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाली. यात्रेसाठी मोठ्या संख्येने गावकऱ्यांसह भागातील नागिरकांनी हजेरी लावली होती. ढोल ताशांच्या गजरात देवाचा उत्सव संपन्न झाला.

श्री मोळेश्वर पाच पांडवांच्या काळातील ऐतिहासिक आणि पुरातन असे देवस्थान आहे. दरवर्षी मोठ्या श्रद्धेने सर्व गावकरी एकत्र येत मोठ्या उत्साहात देवाचा उत्सव साजरा करतात. दरवर्षीप्रमाणे यंदारी गावकरी आणि भाविक मुंबई, पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोळेश्वर गावात एकत्र आले आणि उत्सव साजरा केला. रात्री बाराच्या ठोक्यावर देवाचा छबिना पार पडला आणि ”चांगभलं’चा जयघोष झाला. यावेळी ग्रामस्थांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराच्या अगदी सान्निध्यात असलेल्या या मंदिरात भक्ती, परंपरा आणि निसर्ग यांचं सुंदर मिलन पाहायला मिळालं. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या हारांनी सजलेल्या मंदिरात आणि उत्साहाने भारलेल्या वातावरणात श्री मोलेश्वर देवाचा सोहळा पार पडला.