Kitchen Tips पावसाळ्याचे दिवस म्हंटल की डाळी किंवा तांदूळ किंवा पिठात अळ्या होण सहाजिकच आहे. कारण थंडी किंवा पावसाळ्यात सूर्यप्रकाश नसल्याने डब्यात बंद ठेवलेल्या डाळींना, पिठांना आळ्या लागतात. त्यामुळे संपूर्ण अन्नपदार्थ खराब तर होतातच पण अळ्या (कीडे) झाल्यावर त्या अन्नाचा उपयोग आरोग्यास घातक ठरतो. अशा वेळी घरगुती उपाय करून धान्य, पीठ सुरक्षितपणे ठेवता येते.
हे करून पहा
१. धान्य व पीठ निवडून स्वच्छ करा- अळ्या दिसल्यास ती डाळ किंवा पीठ लगेच वेगळं ठेवा. शक्य असल्यास ते निवडून स्वच्छ करून उन्हात सुकवा.
२. धान्य कोरडं आणि हवाबंद डब्यात ठेवा- ओलसरपणा अळ्या होण्याचं प्रमुख कारण आहे. त्यामुळे कोरड्या हवामानात धान्य हवाबंद डब्यांतच साठवा.
३. कडुलिंबाचे किंवा लवंगाचे उपयोग – डब्यांत काही कडुलिंबाची पाने, लवंगा, किंवा हिंग टाकल्यास अळ्या आणि कीटक दूर राहतात.
४. फ्रीजरचा वापर करा – डाळ किंवा पीठ 2-3 दिवस फ्रीजरमध्ये ठेवून नंतर हवाबंद डब्यात ठेवल्यास अळ्यांची अंडी निष्क्रिय होतात.
५. नियमित साफसफाई – घरातील स्वयंपाकघर, डबे, आणि टोपली यांची नियमित स्वच्छता ठेवा.
डाळी आणि पीठ किती दिवस वापरावं?
डाळी आणि पीठ यांचा उपयोग आपल्याला दररोजच्या जेवणात होतो. मात्र योग्य साठवण आणि वापराची कालमर्यादा लक्षात न घेतल्यास त्यात अळ्या, कीटक, बुरशी किंवा गंध येण्याची शक्यता वाढते.
डाळी (तूर, मूग, चणा, मसूर इ.)
वापराची मुदत – साठवण योग्य असल्यास ६ ते १२ महिने वापरता येते. मात्र डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी महिन्याला एकदा डाळं उन्हात वाळवावी.
गहू पीठ / बेसन / तांदूळ पीठ
गहू पीठ – १.५ ते २ महिने (थंडीच्या दिवसांत ३ महिने)
बेसन – १ ते १.५ महिने
तांदळाचं पीठ – २ ते ३ महिने
पीठ लवकर खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे ते थोडं थोडं दळून वापरणं चांगलं.
How To Get Rid Of Mosquitoes At Home – मच्छरांमुळे भयंकर त्रास होतोय? घरच्या घरी ‘हा’ उपाय करून पहा!
डाळी आणि पीठ सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्याल
- Airtight डबे वापरा
- ओलसरपणा टाळा
- दर महिन्याला धान्य व पीठ पहा व वाळवा
- खवखवट गंध, रंग बदल किंवा अळ्या दिसल्यास वापर करू नये