Maharashtra Assembly Election 2024 मध्ये महायुतीने जबरदस्त मुसंडी मारत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. महायुतीच्या या वादळी लाटेत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा दारुण पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांची कामगिरी काँग्रेसपेक्षा बरी राहिली. मात्र, काँग्रेसची या निवडणूकीत चांगलीच वाताहत झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून आणि माजी मंत्री Balasaheb Thorat संगमनेरमधून पराभूत झाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
बाळासाहेब थोरात यांनी 1985 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर तब्बल 8 वेळा ते संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा 62 हजार 252 मतांनी पराभव केला होता. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जादू चालली नाही. शिवसेना शिंदे गटाचा तरुण उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा 10 हजार 560 मतांनी पराभव केला. एक दोन नाही तर 8 टर्म आमदारकी भूषवण्याची किमया साधणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव काँग्रेससाठी भविष्याच्या दृष्टीने धोक्याची घंटी वाजवणारा आहे. येत्या काळात राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार हे मात्र नक्की. तत्पूर्वी बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय वाटचालीवर एकदा नजर मारावीच लागेल.
बाळासाहेब थोरात यांचे प्रारंभिक जीवन
शांत आणि संयमी व्यक्ती म्हणून बाळासाहेब थोरात यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे. राजकीय वारसा त्यांना जन्मत: च लाभला होता. 7 फेब्रुवारी 1953 रोजी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांच्या घरात बाळासाहेब थोरात यांचा जन्म झाला. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. विजय भाऊसाहेब थोरात हे बाळासाहेब थोरात यांचे मुळ नाव होय. बाळासाहेब थोरात यांचे वडील भाऊसाहेब थोरात हे शेतकरी नेते आणि संगनमेर मतदारसंघाचे माजी आमदार होते. 1978 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भीम पराक्रम केला होता. महाराष्ट्र सरकारमध्ये सोळा वर्ष मंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या बी.जे.खताळ-पाटील यांचा त्यांनी पराभव केला. राजकीय वारला लाभल्यामुळे राजकारणचा बाळकडू बाळासाहेब थोरात यांना वडीलांकडून मिळालं.
राजकीय कुटुंबात जन्म झाल्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांची जाणीव होत होती. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात असताना ते अभ्यासात तरबेज होते. प्राथमिक शिक्षण संगनमेरमधून पूर्ण केल्यानंतर पुढील पदवीचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी पुणे गाठले आणि 1975 साली फर्ग्युसन कॉलेजमध्ये बी.ए शाखेतून पदवी पूर्ण केली. त्यानंतर तीन वर्ष त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि ILS या लॉ कॉलेजमधून LLB चे शिक्षण पूर्ण केले.
राजकीय कारकिर्दीला सुरुवात
बाळासाहेब थोरात यांचे 1975 साली शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्याच्या माध्यमातून राजकारणाच एन्ट्री मारली. 1975 ते 1985 अशी 10 वर्ष त्यांनी आपल्या मतदारसंघात मेहनत घेतली, लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या, गाव बैठका घेतल्या, लोकांमध्ये मिसळले आणि 1985 साली पहिल्यांदा अपक्ष म्हणून विधानसभेच्या रिंगणात उडी मारली. विशेष म्हणजे विद्यमान काँग्रेसच्या आमदार शकुंतला खंडेराव यांचा बाळासाहेब थोरात यांनी 10,159 मतांनी पराभव केला. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या राजकीय जीवनाचा दणक्यात प्रारंभ केला.
Bapu Biru Vategaonkar – आया बहिणींना त्रास देणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणारा कृष्णेचा वाघ
बाळासाहेब थोरात 1985 साली पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर सलग 8 वेळा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे. मतदारांनी भरभरून प्रेम बाळासाहेबांवर केलं त्यामुळेच सलग 8 वेळा आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडली. 1985 साली पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला. 1988 साली त्यांनी संगनमेर येथे 1 लाख लीटर क्षमतेच्या शासकीय दुग्ध शाळेची स्थापना केली. त्यांचा काम करण्याचा अनुभव पाहता त्यांनी संगमनेर तालुका सहकाही दुध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
स्वित्झर्लंड आणि डेन्मार्क या देशांचा अभ्यास दौरा
संगनमेर तालुक्यात भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्याच्या हालचाली त्यांनी 1984 साली सुरू केल्या. अखेर त्यांच्या चळवळीला 1989 साली यश आले आणि भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या फेरवाटपाचा प्रश्न मार्गी निघाला. 1990 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा बाळासाहेब थोरात आमदार झाले. एकीकडे त्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावर होता. तर दुसरीकडे समाजाच्या गरजा पाहून त्या पद्धतीने त्यांच्या कामाचा धडाका सुरू होता. त्याच अनुषंगाने 1991 साली रेशीम उद्यागोला सुरुवात केली. 1992 साली त्यांनी आपला मोर्चा परदेशात वळवला. विदेशी तंत्रज्ञानावर आधारित दुग्ध व्यवसायाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्याला फायदा व्हावा यासाठी त्यांनी शेती, दुग्ध व्यवसाय, पाण्याचे नियोजन, पशुसंवर्धन इत्यादी गोष्टींचे बारकावे शिकून घेण्यासाठी स्वित्झर्लंड, डेन्मार्क या देशांचा अभ्यास दौरा त्यांनी केला. भविष्यात त्यांच्या या अभ्यास दौऱ्याचा शेतकऱ्यांना बराच फायदा झाला.
RR PATIL – अजित पवारांच्या वक्तव्यामुळे आर आर आबांचे नाव चर्चेत, वाचा सविस्तर…
1993 ते 1994 या काळात बाळासाहेब थोरात यांनी संगनमनेर भाग सहकारी साखार कारखान्याचे चेअरमन, संगननेर तालुका सहकरी पतसंस्थांच्या फेडरेशेचे चेअरमन, नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को ऑफ लि. नवी दिल्ली येते संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड. दोन वर्षांच्या कालावधीत थोरातांनी विविध पदांवर काम करत आपल्या कामाची छाप पाडली. लोकांमध्ये मिसळून अनेक काम त्यांनी मार्गी लावली आणि याचे फळ त्यांना 1995 च्या विधानसभा निवडणुकीत मिळाले. संगमनेर मतदारसंघातून काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ते निवडून आले.
विविध पदांवर उमटवली मोहोर
बाळासाहेब थोरात आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक वेळा सहकारी भाग साखर कारखान्याच्या संचालकपदाची जबाबदारी निर्विवादपण पार पडली. अनेक वेळा त्यांची बिनविरोध निवड झाली. 1999 ची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदा बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. पाटबंधारे व लाभक्षेत्रात विकास राज्यमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली. तसेच 2000 साली उस्मानाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांचा राजकीय आलेख सतत उंचावत गेला आहे. त्यानंतर त्यांनी राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि 2019 ची विधानसभा विक्रमी आठव्यांदा जिंकत काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाली होती.
तरुण उमेदवाराने दिला दणका
सहकार क्षेत्रात बाळासाहेब थोरात यांनी आपल्या नावाच चांगलाच डंका वाजवला होता. त्यामुळे संगमनेर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या नावाचं वजन आजही तितकेच आहे. याच गोष्टीचा फायदा त्यांना 2024 विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता होती. मात्र, 2024 ची विधानसभा निवडणूक बाळासाहेब थोरात यांना चांगलीच जड गेली. सर्व एक्झिट पोल, राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार, वृत्तवाहिन्या कोणीच बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाच भाकीत वर्तवलं नव्हत. थोरातांचा विजय पक्का मानला जात होता. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या तरुण उमेदवार अमोल खताळ यांनी थोरातांना अस्मान दाखवत पराभवाची धूळ चारली.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार संगमनेर विधानसभा मतदारसंघात 75.19 टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढलेली पहायला मिळाली. याच वाढलेल्या मतदानात अमोल खताळ यांना प्रचंड फायदा झाल्याचे बोलले जात आहे.
Ganpatrao Deshmukh – एसटीने प्रवास करणारा एकमेव आमदार, Guinness Book of World Record मध्ये आहे नोंद
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.