माथाडी वस्तीत ‘ज्ञानाची भेट’! मानव आर्टस् फाउंडेशन व युथ फॉर सेवा संस्थेकडून 200 विद्यार्थ्यांना शालेय बॅगांचे वाटप

नेरुळ आणि सानपाडा परिसरातील माथाडी कामगार वस्त्यांमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी मानव आर्टस् फौंडेशनच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला मातृ संस्था महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्र यांच्या सहकार्याने आणि युथ फॉर सेवा संस्थेच्या माध्यमातून एकूण 200 शालेय बॅगांचे वाटप करण्यात आले.

यामध्ये नेरुळ येथे 132 तर सानपाडा येथे 68 विद्यार्थ्यांना बॅगा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला आहे.

या कार्यक्रमाला युथ फॉर सेवा संस्थेच्या जयेशा पवार, महिला विकास आणि शिशु संस्कार केंद्राचे मुख्य समन्वयक सचिन कर्डक, मानव आर्टस् फौंडेशनच्या अध्यक्ष उज्वला वाडकर, सचिव सेजल माने आणि खजिनदार आशा मनसुखे यांची उपस्थिती होती. तसेच कै. अण्णासाहेब पाटील रहिवाशी संघाचे उपाध्यक्ष मारुती मोहिते आणि खजिनदार बबन जाधवही उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अजय सुपेकर, योगेश पवार आणि रोहिदास धुंदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!