Wai News – इयत्ता 6 वी प्रज्ञाशोध परीक्षा; 162 गुणांसह श्रीराज वाडकर केंद्रात अव्वल, प्रणव सुतारचीही चमकदार कामगिरी

वाई (Wai News) तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, वयगाव येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता 6 वी प्रज्ञाशोध (Pradnya Shodh Pariksha) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा आणि गावाची मान अभिमानाने उंचावली आहे. या परीक्षेत श्रीराज संजय वाडकर याने 162 गुण मिळवत केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रणव एकनाथ सुतार याने 154 गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवत चमकदार कामगिरी केली. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य नियोजन यांचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे, लहान वयातच त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशात मार्गदर्शक शिक्षक संतोष वाकचौरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या परिश्रमामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्येही अभ्यासाबाबत प्रेरणा निर्माण होईल, अशी आशा शिक्षकांसह ग्रामस्थांनी व्यक्त केली.

प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजे काय? What is Pradnya Shodh Pariksha

प्रज्ञाशोध परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि शैक्षणिक गुणवत्तेचा सर्वांगीण आढावा घेणारी स्पर्धात्मक परीक्षा आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची विश्लेषण क्षमता, समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते. तसेच पुढील शिष्यवृत्ती परीक्षांसाठी ही परीक्षा महत्त्वाची पायाभरणी ठरते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत तिचे विशेष स्थान आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!