Mirae Asset Foundation Scholarship Program – 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार!

सर्व साधारण कुटुंबातील मुलांना बऱ्याच वेळा आर्थिक अस्थिरतेमुळे शिक्षण पूर्ण करण्यात अडचणी येतात. अशाच होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रासह भारतातील अनेक संस्था, कंपन्या आणि सरकारच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. अशीच एक शिष्यवृत्ती म्हणजे Mirae Asset Foundation Scholarship Program होय. या शिष्यवृत्तीअंतर्गत, सध्या भारतामध्ये पदवीपूर्व किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळू शकते.

पात्रता काय आहे?

  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक वर्षात किमात 60 टक्के गुण मिळाले असले पाहिजेत.
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • संपूर्ण भारतातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
  • सध्या भारतात पदव्यूत्तर अभ्यासक्रम घेत असलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र

(टीप – संबंधित संस्थेला दिले जाणारे एकूण शैक्षणिक शुल्क हे 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असावे)

Eklavya Scholarship Maharashtra लवकरात लवकर अर्ज करा, फक्त पाच दिवस बाकी

अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार?

  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचा ओळखीचा पुरावा (आधार कार्ड)
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याची मागील वर्षाची गुणपत्रिका
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याची बारावीची गुणपत्रिका
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असेल तर)
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे चालू वर्षाचे प्रवेश पत्र. ज्यामध्ये शुल्काची माहिती दिलेली असावी.
  • कुटुंबाचा उत्पन्ना दाखला – पालकांच्या मागील आर्थिक वर्षासाठीचा ITR रिटर्न, पालकांची पगार पावती/पगारपत्र, जर पालकांचा व्यवसाय असेल तर, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला सक्षम सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेले EWS प्रमाणपत्र (आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक) सादर करणे आवश्यक आहे.
  • बँक खात्यांची माहिती

अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराMirae Asset Foundation Scholarship Program

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जुलै 2025