Tennis Cricket विश्वावर शोककळा, संगमनेरचा हुकमी एक्का शेखर शेळकेच अपघाती निधन

टेनिस क्रिकेट (Tennis Cricket) विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या शेखर शेळकेच अपघाती निधन झालं आहे. संयमी आणि विस्फोटक फलंदाजीमुळे त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ या नावाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळखलं जात होतं. त्याच्या निधनामुळे संगमनेर तालुक्यासह टेनिस क्रिकेट विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शेखर शेळके संगमनेर … Read more

Bombay High Court Recruitment – पर्सनल असिस्टंट (PA) पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, पगाराचा आकडा पाहून चकित व्हाल

मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court Recruitment) नोकरी करण्यासाठी धडपड करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी. मुंबई उच्च न्यायालयात पर्सनल असिस्टंट (PA) पदासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना जवळपास 67,700 ते 2,08,700 रुपये इतका पगार दिला जाणार आहे. त्यामुळे एक चांगल करिअर घडवण्याची संधी उमेदवारांना आहे. परंतु यासाठी शैक्षणिक पात्रता … Read more

Wai Accident News – तालुक्यात दोन अपघातांमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू, कवठे गावातील एकाचा समावेश

एकीकडे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. तर दुसरीकडे वाई (Wai Accident News) तालुक्यात दोन अपघातांमध्ये दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वेळे आणि जोशीविहीर गावांच्या हद्दीत झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातात मृत्यू झालेला एक तरुण कवठे आणि एक तरुण … Read more

Mahabaleshwar Rain News – भिलारमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्रप्रमुखांच्या कार्यालयाची भिंत कोसळली

सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये धुवांधार पाऊस कोसळला आहे. याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वांनाच बसला आहे. तसेच सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने वाई, महाबळेश्वर, कराड, पाटण, सातारा आणि जावळी तालुक्यांमधील शाळांना बुधवार (20 ऑगस्ट 2025) आणि गुरुवार (21 ऑगस्ट 2025) सुट्टी जाहीर केली आहे. याच दरम्यान महाबळेश्वर (Mahabaleshwar Rain News) तालुक्यातीर … Read more

Wai Rain News – कृष्णा नदीचं रौद्ररूप, छोटा पूल पाण्याखाली; पाहा धडकी भरवणारा Video

Wai Rain News मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे बलकवडी आणि धोम धरण जवळपास 95 ते 98 टक्के भरलं आहे. त्यामुळे दोन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वाई शहरातील महागणपती मंदिरात पाणी गेलं असून कृष्णा नदीने गणपतीच्या चरणांना स्पर्श केलं आहे. तसेच अनेक मंदिरे पाण्यात गेली आहेत. छोटा पूल सुद्धा पाण्याखाली … Read more

Satara Rain Update – पाटणमध्ये NDRF च्या टीमने 11 माकडांना दिलं जीवदान; पाहा थरारक Video

सातारा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने धुवांधार बॅटींग केली आहे. त्यामुळे बऱ्याच गावांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क सुटला आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने याचा फटका नागरिकांसह वन्यप्राण्यांनासुद्धा बसला आहे. पाटण तालुक्यातील संगमनर धक्क्यावर 11 माकडे पुराच्या पाण्यात अडकली होती. यासाठी NDRF च्या टीमला पाचारण करण्यात आलं होत. पावासाने झोडपून काढल्यामुळे आणि कोयना … Read more

Satara Rain Update – सातारा जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’; वाई, महाबळेश्वर, जावळीसह सहा तालुक्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर

साताऱ्यामध्ये (Satara Rain Update) पावसाने धुमाकूळ घातला आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे धोम धरण, बलकवडी धरण आणि कोयना धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील वाई, पाटण, जावळी, महाबळेश्वर, सातारा व कराड तालुक्यातील सर्व शाळांना बुधवार (20 ऑगस्ट 2025) आणि … Read more

Asia Cup 2025 – सूर्या आणि गिलवर BCCI ने सोपवली मोठी जबाबदारी, आशिया चषकासाठी Team India ची घोषणा

आशिया (Asia Cup 2025) चषकाचा रणसंग्राम 9 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. टी-20 स्वरुपात होणाऱ्या या स्पर्धेसाठी BCCI ने टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मंगळवारी (19 ऑगस्ट 2025) बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये सूर्यकुमार यादवची कर्णधारपदी आणि शुभमन गिलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. आशिया चषकासाठी टीम इंडियाची … Read more

Koyna Dam Update – कोयना धरणाचे सहा वक्र धरवाजे 9 फुटापर्यंत उघडण्यात आले; 65, 600 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू, पाहा Video

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये धुवांधार पाऊस सुरू आहे. तसेच पुढील काही तास असाच पाऊस सुरू असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे कोयना धरणाची (Koyna Dam Update) पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे 9 फुटांपर्यंत उघडण्यात आले आहे. सध्या 65,600 क्सुयेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील … Read more

Wai Rain News – धोम बलकवडी धरणातून 5025 क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यात येणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. घाटमाथ्यांवर सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्याकरता नदीपात्रामध्ये 4020 क्युसेकने विसर्ग सुरू होता. परंतु पावसाची संततधार सुरू असल्यामुळे 5052 क्युसेकने विसर्ग नदीपात्रामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालय यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. जिल्हा माहिती कार्यालय, सातारा … Read more