राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची (Weather Update Marathi) शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) च्या अंदाजानुसार हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये जाणवू शकतो. विशेषतः १८ ते २० मार्चदरम्यान हवामान अधिक अस्थिर होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत, तसेच हवामानाचा अद्ययावत अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करावीत, असे आवाहन कृषी विभाग कडून करण्यात आले आहे. संभाव्य पाऊस, वादळी वारे आणि गारपीट यामुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही प्रशासनाने म्हटले आहे
राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह #पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. १८ ते २० मार्चदरम्यान परिस्थिती अधिक… pic.twitter.com/yAgtWXQWTE
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 13, 2026
शेतकऱ्यांसाठी खबरदारी :
• काढणी केलेली पिके उघड्यावर न ठेवता ताडपत्रीने झाकून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत.
• हवामानाचा अंदाज पाहूनच काढणी आणि मळणीची कामे करावीत.
• वादळी वाऱ्यांच्या शक्यतेमुळे फळबागा व उभ्या पिकांना आधार देऊन बांधणी करावी.
• शेतात साचलेले पाणी त्वरित बाहेर जाण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून पिकांचे नुकसान टळेल.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.