IPL 2026 – थाला पुन्हा राडा करणार! निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम

आयपीएलमधील सर्वता यशस्वी कर्णधार आणि चाहत्यांच्या गळ्यातील ताईत महेंद्र सिंग धोनी IPL 2026 च्या हंगामात खेळणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली असून निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के विश्वनाथन यांनी सांगितले की, ४४ वर्षीय धोनी आगामी हंगामातील सर्व सामने खेळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून धोनी केवळ काही सामने खेळेल, अशा चर्चांना उधाण आले होते; मात्र CSK व्यवस्थापनाने त्या सर्व चर्चांना फेटाळून लावले आहे. धोनी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळणार की इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरणार, याचा निर्णय प्रशिक्षक आणि कोचिंग स्टाफ घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान धोनीने मार्चच्या पहिल्या आठवड्यातच चेन्नईत दाखल होऊन सरावाला सुरुवात केली आहे. आयपीएल २०२५ मध्ये चेन्नईचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिल्यानंतर यंदा जोरदार पुनरागमन करण्याचे लक्ष्य संघाने ठेवले आहे. पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या सीएसकेला यंदा चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असून संजू सॅसमन आणि शिवम दुबे यांच्या अलीकडील दमदार कामगिरीमुळे संघाचे मनोबल उंचावले आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!