Palak Muchhal Biography – शहीद जवानांच्या कुटुंबासाठी निधी ते 3800 हून अधिक चिमुकल्यांची हृदय शस्त्रक्रिया; प्रसिद्ध गायिकेचं समाजकार्य

‘Beauty With Brain’ हा शब्द फार कमी ऐकायला मिळतो. कारण या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये असणं म्हणजे दुग्ध शर्करा योगचं. अशा काही ठराविक व्यक्तीच या जगामध्ये आहेत. ज्या दिसायला सुंदर तर आहेतच, पण त्यांचे काम त्याहूनही सुंदर आहे. याच पंक्तीमध्ये आता बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलने (Palak Muchhal Biography) आपल्या नावाची नोंद केली आहे. पलक मुच्छल या प्रसिद्ध गायिका असून अनेक चित्रपटांमध्ये गाणं गात त्यांनी श्रोत्यांची मन जिंकली आहेत. आपल्या सुंदरतेने अनेकांना घायाळ केलं आहे. परंतू याच्याही पुढे जात त्यांनी समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. ज्याची दखल साऱ्या जगाने घेतली आहे. पलक मुच्छलच्या या मानवतावादी कार्यामुळे तिला Guinness book of world record मानाच स्थान मिळालं आहे.

‘आपणही समाजाचे काही देणे लागतो’, ही भावना मनामध्ये निर्माण होणे, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आर्थिक सुबत्ता असताना असा विचार अनेकांच्या मनाला शिवतही नाही. मात्र, पलक मुच्छल या सर्वांना अपवाद ठरल्या आणि त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. पलक मुच्छल यांनी Palak Muchhal Foundation च्या माध्यमातून आतापर्यंत 3800 हून अधिक गरजू मुलांवर मोफत यशस्वी हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. कलेच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नाचा मोठा भाग तिने या सर्व समाजकार्यासाठी खर्च केला आहे. तिच्या याच अमूल्य योगदानामुळे तिची Limca Book of Records मध्ये सुद्धा नाव समाविष्ट करण्यात आले आहे. 

संगिताची आवड आणि समाजकार्य

पलक मुच्छल यांचा जन्म 30 मार्च 1992 रोजी मध्य प्रदेशमधील इंदौर येथे एका मध्यमवर्गीय माहेश्वरी मारवाडी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजकुमार मुच्छल आणि आईचे अमिता मुच्छल आहे. त्या व त्यांच्या धाकट्या भावाला, Palash Muchhal ला, संगीताची लहानपणापासून आवड होती. त्यांच्या कलेला आई-वडिलांनी पाठिंबा दिला आणि दोन्ही भाऊ-बहिणीने गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. सध्याच्या घडीला दोघांनीही गायन क्षेत्रामध्ये आपआपली छाप पाडली आहे. संगिताच्या जोडीने पलकला लहान असतानाचा सामाजिक कार्याची ओढ लागली होती. गायन क्षेत्रासह समाजकार्याचा तिचा प्रवास लहान असतानाच सुरू झाला होता.  

 

सात वर्षाच्या वयात शहीद जवानांसाठी निधी उभारला

वयाच्या चौथ्या वर्षी पलक यांनी गाणे शिकायला सुरुवात केली. “कल्याणजी-आनंदजी लिटिल स्टार” यांच्या समुहामध्ये त्या सहभागी झाल्या आणि गायनाचा त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. संगितातले बारकावे त्यांनी शिकून घेतले. गायनाचा प्रवास सुरू असतानाच समाजकार्याची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झाली. त्यांच्या या समाजकार्याला आई-वडिलांनी सुद्धा पाठिंबा दिला. 1999 साली कारगील युद्ध झालं आणि या युद्धामध्ये भारताचे 500 हून अधिक जवान शहीद झाले. भारताने हे युद्ध जिंकले त्यामुळे संपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण होते. मात्र, जे जवान या युद्धात शहीद झाले त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तेव्हा पलक या सात वर्षांच्या होत्या. शहीद जवानांच्या कुटुंबाप्रति सर्वांच्याच मनात आदराचे स्थान होते. पलक आणि त्यांच्या कुटुंबाने सुद्धा शहीद जवांनासाठी काही तरी चांगल्या गोष्टी करण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी पलकने इंदौरमधील दुकानांमध्ये जाऊन गाणी गायली आणि शहीद जवानांच्या कुटुंबासाठी निधी उभारला. The Global India ने दिलेल्या वृत्तानुसार जवळपास 25 हजार रुपयांचा निधी तिने जमा केला होता. त्याचवर्षी ओडिशा चक्रिवादळामधील पीडितांसाठी तिने गायनाच्या माध्यमातून निधी उभारला. 

Sunny Fulmali Success Story – झोपडी ते सुवर्णपदक! वडील नंदीबैल घेऊन भविष्य सांगतात; मुलाने भारताची मान अभिमाने उंचावली

“Saving little hearts is the mission of my life. मी जेव्हा गाते तेव्हा एक जीव वाचतो आणि यापेक्षा मोठा आशिर्वाद काय असू शकतो,” असे पलकने हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

फाउंडेशनची स्थापना

पलक मुच्छल यांनी त्यांच्या गाण्याचा वापर करून गरीब, हृदयविकारग्रस्त बालकांच्या उपचारासाठी निधी उभारण्याचे काम सुरू केले. 2006 च्या सुमारास त्यांनी स्वतःची संस्था, Palak Muchhal Heart Foundation स्थापन केली, ज्याचा मुख्य उद्देश गरजू मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मदत करणे आहे. उदाहरणार्थ, एका विद्यार्थ्याच्या हृदय दोषविरुद्धच्या शस्त्रक्रियेसाठी तेथील शिक्षकांनी पलककडे मदत मागितली आणि त्यांनी रस्त्यावरील विक्रेत्याच्या गाडीवर एक कल्चर शो आयोजित करून निधी उभारला. 

यामुळे प्रभावित झालेल्या पलक मुच्छल यांनी एकाच विद्यार्थ्यापर्यंत न थांबता आपला हा समाजकार्याचा प्रवास अखंड सुरू ठेवला आणि भारतातील अनेक चिमुकल्यांची यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतला. 2024 पर्यंत जवळपास 3000 मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्याच पलक मुच्छल यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या अलौकिक आणि प्रेरणादाई कार्यामुळे हजारो मुलांचे प्राण वाचले आहेत, त्यांना नवीन आयुष्य मिळालं आहे. 

बॉलिवूड प्रवासाला समाजकार्याची जोड

पलक मुच्छल यांचा बॉलिवूडमध्ये प्रवास 2011 मध्ये सुरू झाला, जेव्हा त्यांनी Damadamm! चित्रपटासाठी गायिकेचे काम केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये हिट गाणी गायली. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात तिच्या आवाजाची चर्चा रंगू लागली. फक्त हिंदी चित्रपटांमध्येच नाही तर विविध भाषांमध्ये तिने गाणी गायली आणि देशभरात आपला चाहता वर्ग निर्माण केला. पण या गाण्यांच्या मैफिलीत तिने समाजकार्यात अंतर दिले नाही, का डोक्यात प्रसिद्धीची हवा जाऊन दिली नाही. दोन्ही गोष्टींमध्ये योग्य ती ताळमेळ साधत तिने आपलं कार्य सुरू ठेवलं आहे. 

Vithal Kamat – हॉटेलमध्ये स्वत: कूक ते यशस्वी उद्योजक, मराठी माणसाचा अटकेपार झेंडा

कौतुकाची थाप आणि पुरस्कार

पलक मुच्छल यांनी आपल्या गायनाच्या जोरावर संपूर्ण भारतात आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्यांच्या याच योगदानासाठी आणि संगीतासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. उदा. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार. तसेच मार्च महिन्यात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आलं.   त्याचबरोबर त्यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून सुरू केलेल्या समाजकार्यासाठी त्यांची नुकतीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स व लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. हा संपूर्ण भारतवासीयांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे. 

पलक मुच्छल यांनी गायलेली काही प्रसिद्ध गाणी

  • Kaun Tujhe  – चित्रपट M.S. Dhoni: The Untold Story मधील. 
  • Baatein Yeh Kabhi Na – चित्रपट Khamoshiyan.
  • Naiyo Lagda – चित्रपट Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Madh

या प्रसिद्ध गाण्यांव्यतिरिक्त “Hua Hain Aaj Pehli Baar”, “Tere Naina Mere Naino Se” इत्यादी गाण्यांना त्यांनी आपल्या जादुई आवाजाने समुधूर केलं आहे. 

हृदय शस्त्रक्रियांचा आकडा व सामाजिक कार्य

Palak Muchhal यांच्या संस्था Palak Muchhal Heart Foundation द्वारे गरजू बालकांसाठी हृदय शस्त्रक्रियांचा खर्च उभारला जात आहे. 

  • जून 2024 पर्यंत त्यांनी 3,000 हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पुरवल्या आहेत.
  • नोव्हेंबर 2025 पर्यंत हे आकडे 3,800+ शस्त्रक्रिया पर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे.

पलक मुच्छल यांनी समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सध्या चहुबाजूंनी कौतुंकाचा वर्षाव केला जात आहे.  

Tallest and Shortest Person – ‘या’ आहेत जगातील सर्वाच उंच आणि लहान व्यक्ती, भारतातील महिला आहे पहिल्या क्रमांकावर; जाणून घ्या सविस्तर…

error: Content is protected !!