जगभरात शारीरिक शिक्षण (Physical Education Information In Marathi) हा एक महत्वाचा विषय म्हणुन शिकवला जातो. करिअर करण्याच्या दृष्टीने शारीरिक शिक्षण हा एक उत्तम पर्याय म्हणुन गेल्या काही दिवसांमध्ये पुढे आला आहे. शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम जगभरात वेगवेगळ्या पध्दतीने शिकवला जातो.
शारीरिक शिक्षण म्हणजे काय? (What Is Physical Education)
शारीरिक शिक्षण (Physical Education) हे पोषण, शरीरासाठी प्रशिक्षण आणि निरोगी जीवन जगण्याचे शास्त्र आहे. मानवाचे शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी ज्या शिक्षणाची गरज असते ते शिक्षण म्हणजे शारीरिक शिक्षण. शारीरिक शिक्षणामध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त योगा, प्राणायम, व्यायाम आणि मैदानी खेळांचा समावेश असतो. नोकरी तसेच व्यवसाय करण्याच्या दृष्टीने हे क्षेत्र भविष्यात एक उत्तम संधी निर्माण करणार आहे.
शारीरिक शिक्षण महत्वाचे का आहे? (Importance Of Physical Education)
धकाधकीच्या जीवनात शारीरिक शिक्षणाचे महत्व खूपच वाढलं आहे. 90 च्या दशकात विध्यार्थ्यांचा कल मैदानी खेळांकडे जास्त होता. पण आधुनिकतेमुळे मैदान ओस पडायला लागली आणि मैदानी खेळांची जागा मोबाईलने घेतली. मुलांची हालचाल कमी झाली त्यामुळे लहान वयात वजन वाढणे, हातपाय धुकणे, थकवा जाणवणे अशा समस्यांचा मुलांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे शारीरिक शिक्षण हे केवळ विद्यार्थी जीवनातच नव्हे, तर पुढील संपुर्ण जीवनातदेखील महत्वपूर्ण भुमिका पार पाडणार आहे.
शारीरिक शिक्षणामुळे आरोग्य चांगलं राहतं आणि आरोग्य चांगलं राहिल्यामुळे मन ताजतवानं होण्यास मदत होते. वाढणाऱ्या प्रदुषणामुळे आरोग्याच्या समस्या मोठ्याप्रमाणात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शालेय जीवनातच मुलांना आरोग्य, नियमीत व्यायाम, मैदानी खेळ ई. यांसारख्या शारीरिक शिक्षणाची गरज आहे. शारीरिक शिक्षणामुळे शरीर मजबुत होण्यास मदत होते, स्मरणशक्ती वाढते, मानसिक विकास होतो. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने आपल्या आवडीचे क्षेत्र निवडताना फायदा होतो.
शारीरिक शिक्षणात (Physical Education) कोणत्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे?
ज्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणामध्ये आपलं भविष्य घडवायचं आहे. त्यांच्यासाठी अभ्यासक्रमाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. शारीरिक शिक्षणामध्ये बॅचलर (BPED) तसेच मास्टर्स (MPED) सुध्दा करण्याची संधी उपलब्ध आहे. दोन्ही अभ्यासक्रमांच्या माध्यमातून एका चांगल्या आणि उत्तम जीवनशैलीचच्या दिशेने प्रवासाला सुरुवात होऊ शकते. बॅचलर कोर्सचा कालावधी साधारण 3 ते 4 वर्ष असु शकतो संबंधित महाविध्यालय किंवा संस्थेवर अवलंबुन आहे. तर मास्टर करण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी असू शकतो.
बॅचलर ऑफ फिजीकल एज्युकेशन (Bachelor Of Physical Education)
शारीरिक शिक्षणामध्ये (Physical Education) जर बॅचलर करायचं असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाचा निकष म्हणजे, विद्यार्थी कोणत्याही शाखेतून 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष असला पाहिजे. जर बॅचलरसाठी एखादी शिक्षण संस्था प्रवेश परीक्षा घेत असेल तर, विद्यार्थी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करुन संबंधीत शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊ शकतो. प्रवेश घेत्यावेळी विद्यार्थ्याचे वय 17 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे.
काही गोष्टी या काळजीपुर्वक लक्षात ठेवाव्यात जसं की विद्यार्थी हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण झालेला असावा. ज्या शिक्षण संस्थांमध्ये Bachelor Of physical education हा अभ्यासक्रम शिकवला जातो. अशा जवळजवळ सर्वच शिक्षण संस्थांमध्ये शारीरिक चाचणी घेतली जाते. शारीरिक चाचणी घेण्यामागचा महत्वाचा उद्देश असतो तो म्हणजे विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे का नाही हे तपासणे.
अभ्यासक्रमाचा कालावधी 12वी उत्तीर्ण झाल्यावर 3 ते 4 वर्षाचा असतो. आणि एखाद्या विद्यार्थ्याने कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण पुर्ण केले असेल तर, अशा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाचा कालावधी हा 1 ते 2 वर्षांनी असू शकतो.
Bachelor Of physical Education पात्रता
अभ्यासक्रमाचा कालावधी 3 ते 4 वर्ष
• 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 50 टक्के गुणांनी 12वी उत्तीर्ण केलेली असावी. तर, काही शिक्षण संस्थांमध्ये 60 टक्के गुणांनी 12वी उत्तीर्ण हा निकष सुद्दा असू शकतो.
• या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याचे वय 17 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असावं.
अभ्यासक्रमाचा कालावधी 1 ते 2 वर्ष
• विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त महाविध्यालय किंवा विध्यापिठातून कमीत कमी 50 टक्के गुणांनी बॅचलर पदवी प्राप्त केलेली असावी. तर, काही महाविध्यालयांमध्ये 60 टक्के गुणांनी बॅचलर पदवी उत्तीर्ण हा निकष सुध्दा असू शकतो.
• या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याचे वय 19 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे.
टीप : 1 ते 2 वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रेवश घेण्यासाठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. पण, काही महाविध्यालये फक्त पुरुष उमेदवारांना प्राधन्य देतात.
Bachelor of physical Education (BPED) साठी प्रवेश प्रक्रिया कशी असते?
Bachelor Of physical Education म्हणजेच शारीरिक शिक्षणाची सुरुवात आहे. या अभ्यासक्रमाला प्रेवश घेण्यासाठी प्रेवश परीक्षा द्यावी लागते. ही प्रवेश परीक्षा गुणवत्तेच्या आधारावर घेतली जाते. तसेच विद्यार्थ्याची शारीरिक तंदुरुस्ती तपासण्यासाठी शारीरिक तपासणी फेरी घेतली जाते. प्रेवश परीक्षा आणि शारीरिक तपासणी फेरी यांच्या एकत्रीत गुणांच्या आधारे विद्यार्थ्याला प्रवेश दिला जातो.
काही लोकप्रीय प्रवेश परीक्षा आहेत त्यांची यादी खाली दिली आहे.
• Central Universities Common Entrance Test (CUCET) 12वी मध्ये किमान 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी पात्र असेल.
• Regional Institute Of Education Common Entrance Examination (RIE CEE) ही प्रवेश परीक्षा NCERT च्या माध्यमातून घेतली जाते.
• Telangana State Physical Education Common Entrance Test (TS PECET)
• Andhra Pradesh Physical Education Common Entrance Test (AP PECET)
• Delhi University Entrance Test (DUET)
• Maharashtra Bachelor Of Physical Education Common Entrance Test (MAH B.P.ED CET)
महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ही प्रवेश परीक्षा घेतली जाते.
15 मार्च 2024 रोजी पु्ढील प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.
शारीरिक चाचणी 16 ते 18 मार्च 2024 या दिवसांमध्ये घेतली जाणार आहे.
परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली जाईल.
50 गुणांच्या परीक्षेमध्ये 50 प्रश्न विचारले जातील.
परीक्षेचा कालावधी हा एक तास असेल
परीक्षा मराठी, इंग्रजी आणि हिंदी तिन्ही भाषांमध्ये देता येईल.
MAH B.P.ED. CET परीक्षेचा पॅटर्न
सामान्य ज्ञान 15 प्रश्न, Mental Ability 15 प्रश्न आणि शिक्षक अभियोग्यता आणि खेळाशी संबंधीत ज्ञान 20 प्रश्न असे सर्व प्रश्न मिळुन 50 गुणांची परीक्षा घेतली जाते. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो. या परीक्षेमध्ये चुकीच्या प्रश्नांसाठी नकारात्मक गुण दिले जात नाहीत.
शारीरिक चाचणी (एकुण 50 गुण)
1) 4*10 Shutttle Run Test – 10 गुण
2) Sit And Reach – 10 गुण
3) Standing Broad Jump Test – 10 गुण
4) Sit Up Test – 10 गुण
5) Medicine Ball throw test (2kg) – 10 गुण
BPED म्हणजेच Bachelor Of physical Education साठी सरकारी आणि खाजगी महाविद्यालये देशभरात आहेत. भारतात असणारी सरकारी तसेच खाजगी महाविद्यालयांची यादी आणि महाराष्ट्रातील महाविद्यालयांची यादी देण्यात आली आहे.
1) सरकरी महाविद्यालये Bachelor OF physical Education (Top BPED Government Colleges In India)
– बनारस हिंदु विद्यापीठ
– छत्रपती शाहू महाराज विद्यापीठ
– बुंदेलखंज विद्यापीठ
– चौधरी चरण सिंह विद्यापीठ
– देवी अहिल्या विद्यापीठ
– दिब्रुगड विद्यापीठ
– इंदिरा गांधी शारीरिक शिक्षण आणि क्रिडा विज्ञान संस्था
– महर्षी दयानंद विद्यापीठ
– पंजाब विद्यापीठ
– लखनौ विद्यापीठ
2) भारतातील नावाजलेली खाजगी महाविद्यालये Bachelor Of Physical Education (Top BPED Private Colleges In India)
– लवली व्यावसायिक विद्यापीठ (LPU)
– एमिटी युनिव्हर्सिटी, नोएडा
– चंदीगड विद्यापीठ (CU)
– आयआयएमटी विद्यापीठ
– कलिंग विद्यापीठ
– NMS विद्यापीठ
– सिघानीया विद्यापीठ
– स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठ
– तीर्थंकर महावीर विद्यापीठ
3) महाराष्ट्रातील महाविद्यालये Bachelor Of physical Education (Top BPED Colleges In Maharashtra) n
कोकण विभाग
– Bombay Physical Culture Association’s College of Physical Education
– मुंबई विद्यापीठ
– पद्मश्री डॉ.डी.वाय पाटील विद्यापीठ, नवी मुंबई
– MES विद्याधिरा कॉलेज ऑप फिजिकल एज्युकेशन, मुंबई
– किशोर पाटील कॉलेज, ठाणे
पुणे विभाग
– श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज बार्शी, सोलपुर
– चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, पुणे
– शारीरिक शिक्षण महाविद्यालय, कोल्हापुर
नागपुर विभाग
– के.डी पवार कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन सावनेर, नागपुर
– SGSM’s नागाजी महाराज शारीरिक शिक्षण महाविद्यालय, नागपुर
– श्री माधाराव वानखाडे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, नागपुर
– स्वर्गीय वसंतराव नाईक कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, नागपुर
– श्री नाशिकराव तिरपुडे कॉलेड ऑफ फिजीकल एज्युकेशन, नागपुर
– भगवान श्री चक्रधर स्वामी कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, चंद्रपुर
– श्रीकृष्ण शारीरिक शिक्षम महाविद्यालय, वर्धा
– नागपुर शारिरिक शिक्षण महाविद्यालय, नागपुर
– इश्वर देशमुख कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, नागपुर
– राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय, चंद्रपुर
– ज्योतीबा कॉलेज ऑफ फिजीकल एज्यूकेशन, नागपुर
छत्रपती संभाजी नगर विभाग
– MSM’s कॉलेज ऑफ फिजीकल एज्यूकेशन, छत्रपती संभाजी नगर
– मत्स्योदरी शिक्षण संस्था कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, जालना
– नवगन शिक्षण संस्था राजुरी कॉलेज ऑप फिजीकल एज्यूकेश, बीड
– श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर
– मिलीया कला, वाणिज्य आणि विज्ञान कॉलेज, बीड
– SBES कॉलेज ऑफ सायन्स, छत्रपती संभाजी नगर
– ज्ञानोपासक शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ कला, वाणिज्य आणि विज्ञान, परभणी
अमरावती विभाग
– डॉ.बाबासाहेब नांदुरकर कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, यवतमाळ
– श्री शिवाजी कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, अमरावती
– बीबी आर्ट्स एनबी कॉमर्स आणि बीपी सायन्स कॉलेज,यवतमाळ
– श्री ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगळे सायन्स आणि आर्ट्स कॉलेज शेगाव, बुलढाणा
– श्री HVP मंडळ डिग्री कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, अमरावती
– लोकहीत कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, यवतमाळ
– हणुमान व्यायाम शाळा क्रिडा मंडळ फिजीकल कॉलेज, यवतमाळ
– विषुद्दा विध्यालय सोसायटी कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन कॉलेज, यवतमाळ
– सरकारी विधर्भ इन्स्टीट्युट ऑप सायन्स आणि ह्युमॅनिटीज, अमरावती
नाशिक विभाग
– सदगुरु एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, जळगाव
– केसीईएस कॉलेज ऑफ एज्युकेशन, जळगाव
– बीपीएचई सोसायटी ऑफ अहमदनगर कॉलेज, अहमदनगर
– श्रीपाद कृष्णा कोल्हाटकर महाविद्यालय, जळगाव
Bachelor Of Physical Education चा अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर करिअर संधी
Bachelor Of physical Education (BPED) मध्ये करीयर घडवण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत.
BPED पदवी प्राप्त केल्यानंतर विध्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक मार्ग सुरु होतात. त्यातले काही लोकप्रिय जॉब प्रोफाईल बद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करु.
क्रीडा प्रशासक (Sports Administrator) : क्रीडा प्रशासक विविध कामे पार पाडतो जसे की, स्पोर्ट्स क्लब, फिटनेस सेंटर, क्रीडा संस्था इत्यादींमध्ये प्रामुख्याने क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन आणि वेळा पत्रक, बजेट व्यवस्थापिक करणे अशी महत्वाची काम पार पाडण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. क्रीडा प्रशासकाच सर्वात महत्वाच काम असत ते म्हणजे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणावर देखरेख ठेवणे.
योगा ट्रेनर (Yoga trainer) : योगा ट्रेनर म्हणुन विद्यार्थ्याना त्यांची तंदुरुस्ती आणि शरीर आणि मन दोन्हीमध्ये वैयक्तिक आरोग्य वाढविण्यासाठी योगाची कला शिकवतो. बदलेले वातावरण आणि बैठी जीवनशैली त्यामुळे योगा ट्रेनर मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. भविष्यात एक मोठा व्यवसाय म्हणुन सुध्दा यो क्षेत्राकडे पाहिले जात आहे.
क्रीडा पत्रकार (Sports Journalist) : क्रीडा पत्रकार हा व्यावसायिक क्रीडा आणि खेळांबद्दल अहवाल देतो तसेत विविध खेळांसंदर्भात कथा लिहून प्रसारीत करण्याचे महत्वपुर्ण काम करतो. क्रीडा पत्रकाराने प्रशिक्षक आणि खेळाडूंची मुलाखत घेणे, क्रीडा आकडेवारीचा अहवाल देण्यासारखी कामे पार पाडतो. तसेच, ज्यांची भाषण शैली चांगली आहे त्यांना चालू खेळामध्ये समालोचन करण्याची संधी सुध्दा उपलब्ध असते. एक क्रीडा पत्रकार हा टेलिव्हिजन, प्रिंट आणि रेडिओसह विविध माध्यम प्लॅटफॉर्मसाठी काम करु शकतो.
जिम ट्रेनर (Gym Trainor) : व्यायाम ट्रेनर म्हणुन व्यायामशाळा किंवा वैयक्तिक ट्रेनरची प्रमुख जबाबदारी म्हणजे क्लायंटला व्यायाम आणि दिनचर्या दाखवणे. याशिवाय, एक प्रशिक्षक क्लायंटला योग्य फिटनेस सुनिश्चित करण्यासाठी वेळोवेळी मदत करत असतो. व्यावसायाच्या दृष्टीने ऑनलाईन जीम ट्रेनर म्हणुन सुध्दा करिअर घडवण्याची उत्तम संधी आहे.
या काही महत्वाच्या जॉब प्रोफाईल व्यतिरीक्त तूमच्याकडे बोलण्याची जर उत्तम शैली असेल तर क्रीडा समालोचक, क्रीडा प्रशासक, स्पोर्ट्स फोटोजर्नलिस्ट, अंपायर/रेफरी, शिक्षक/प्रशिक्षक, स्पोर्ट्स किंवा अॅथलेटिक ट्रेनर असा विवीध जॉब प्रोफाईल आहेत.
शारीरिक शिक्षण मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (MASTERS OF PHYSICAL EDUCATION)
MPED Master Of Physical Education म्हणजेच शारीरिक शिक्षण मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन. MPED हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात सांघिक व्यवस्थापन, क्रीडा प्रशिक्षण, वैध्यक, आरोग्य शिक्षण आणि पोषण यांच्याशी संबंधित विषयांचा समावेश असतो. या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी आवश्यक असलेले व्यावहारिक कौशल्य आणि त्यातले बारकावे विद्यार्थ्यांना समजणे खूप गरजेचे आहे.
शारीरिक शिक्षण हे क्रिडा-संबंधित क्रियाकलपांशी संबंधित क्षेत्र आहे. क्रिडा विज्ञान, क्रिडा मानसशास्त्र, क्रीडा संशोधन पद्दती, क्रीडा संबंधित औषधांचे ज्ञान, व्यायाम शरीरविज्ञान इ. विषयांशी संबंधित आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांना संबंधित क्षेत्रातील कौशल्य वाढविण्यास सक्षम करतो.
BPED पुर्ण केल्यानंतर MPED हा दोन वर्षांचा कोर्स केला जातो. हा दोन वर्षांचा कोर्स केल्यानंतर क्रीडा, अॅथलेटिक्स, क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा समुपदेशन, क्रीडा मानसशास्त्र या क्षेत्रात करिअर कराण्याची संधी निर्माण होते.
1) MPED (Master Of Physical Education) साठी पात्रता निकष काय आहेत?
ज्या विद्यार्थ्यांनी शारीरिक शिक्षणात पदवी (BPED – Bachelor Of physical Education) पुर्ण केली आहे. असे विद्यार्थी MPED साठी प्रवेश घेऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या BPED अभ्यासक्रम पुर्ण केला आहे. असे विद्यार्थी ट्रेनर किंवा थेरपिस्ट सारख्या व्यवसायात प्रवेश करतात. पण देशभरात किंवा जगभरात बऱ्याच अशा कोचींग संस्था आहेत. या संस्था प्रामुख्याने MPED कोर्स पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देतात. म्हणुन हा पात्रतेच्या दृष्टीने हा एक महत्वाचा अभ्यासक्रम आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून किमान 50 ते 60 टक्के गुणांनी बीपीईड (BPED) म्हणजेच शारीरिक शिक्षण पदवी पु्र्ण केली आहे. असे सर्व विद्यार्थी MPED अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत. काही विद्यापीठांमध्ये पात्रता निकष वेगळे असू शकतात.
2) MPED (Master In Physical Education) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया कशी असते?
MPED अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी देशभरात राष्ट्रीय-स्तरीय किंवा राज्य-स्तरीय शैक्षणिक प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. काही परीक्षा या राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जातात. देशभरात घेतल्या जाणाऱ्या काही महत्वुर्ण प्रवेश परीक्षांची थोडक्यात माहिती.
A) Common University Entrance Test (CUET)
या परीक्षेला पुर्वी सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एंट्रस टेस्ट (CUCET) या नावाने ओळखले जात होते. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून डॉक्टरेट, पदव्युत्तर, अंडरग्रेजुएट, इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट, डिप्लोमा सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.
• प्रवेश परीक्षा वर्षातून एकदा घेतली जाते.
• संगणक आधारित चाचणी असते.
• नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाते.
• इंग्रजी, मराठी, हिंदीसह विविध भाषांमध्ये विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात.
B) Regional Institute OF Education Common Entrance Examination (RIE CEE)
परीक्षा National Council Of Educational Research And Training (NCERT) च्या माध्यमातून घेतली जाते.
• वर्षातून एकदा परीक्षा घेतली जाते.
• परीक्षा संगणकावर घेतली जाते.
• परीक्षा देण्यासाठी विशिष्ट फी आकारली जाते. ओपन आणि ओबीसी साठी 900 रु. SC/ST साठी 450 रु.
• 140 मार्कांची परीक्षा असून दोन तासांचा कालवधी असतो.
• 80 प्रश्न विचारले जातात प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात आणि चुकीच्या उत्तराला नकारात्मक गुणपध्दतीद्वारे गुण वजा केले जातात.
C) Physical Education Common Entrance Test Andhra Pradesh (AP PECET)
आंध्र प्रेदश सरकारच्या माध्यामातून AP PECET प्रवेश परीक्षा घेतली जाते.
D) Telangana State Physical Education Common Entrance Test (TS PECET)
तेलंगणा सरकारच्या माध्यमातून TS PECET प्रेवश परिक्षा घेतली जाते.
E) Maharashtra Bachelor In Education Common Entrance Test (MAH B.Ed CET)
महाराष्ट्र सरकारच्या माध्यामातून MAH B.Ed CET परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रातील सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये बीएड अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी महाराष्ट्र सीईटी सेलद्वारे घेण्यात येणारी ही राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे. चार वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम आणि इतर बीएड अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा स्वतंत्रपणे घेतली जाते. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी सर्व उमेदवरांना पात्रता निकष पुर्ण करणे अनिवार्य असते. पात्रता निकष पुर्ण केल्यानंतरच विद्यार्थी अर्ज करु शकतो.
• अर्ज करणारा विद्यार्थी हा भारतातील नागरीक असावा
• विद्यार्थ्याने पदवी अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा
• खुल्या प्रवर्गासाठी किमान 50% गुणांसह बॅचरल पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पुर्ण केलेली असावी. तसेच, इतर प्रवर्गासाठी गुणांची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
• कोणत्याही बॅचलर पदवीच्या अंतीम वर्षाच्या परीक्षेला बसलेले उमेदवार देखील प्रवेश परीक्षेसाठी पात्र असणार आहेत.
• महाराष्ट्रा बाहेरील उमेदवारांना प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरावा लागेल.
प्रवेश परीक्षेला अर्ज करण्यासाठी शुल्क किती आकारले जाईल?
• खुला प्रवर्ग, महाराष्ट्रा बाहेरील सर्व उमेदवार 800 रु शुल्क आकारले जाईल.
• महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 600 रु शुल्क आकारले जाईल.
प्रवेश परीक्षा कशापध्दतीने घेतली जाईल?
• प्रवेश परीक्षा संगणकावर आधारीत ऑनलाईन पध्दतीने घेतली जाईल.
• परीक्षा 100 गुणांची असेल ज्यासाठी 90 मिनीटांचा कालावधी असेल.
• उमेदवार इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये परीक्षा देऊ शकतो.
• नकारात्मक गुणपध्दती नसल्यामुळे प्रत्येक बरोबर प्रश्नासाठी एक गुण असेल.
अधीक माहीतीसाठी cetcell.mahacet.org अधिकृ्त वेबसाईटला भेट द्या.
या प्रवेश परीक्षांव्यतीरिक्त देशभरात PTET, DUET या काही प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.
3) भारतात असणारी सरकारी तसेच खाजगी महाविध्यालयांची यादी आणि महाराष्ट्रातील महाविध्यालयांची यादी देण्यात आली आहे.
भारतातील सराकारी महाविद्यालये (Top Government Colleges For MPEd)
बनारस हिंदु विद्यापीठ (Banaras Hindu University)
छत्रपती शाहू महाराज युनिवर्सिटी (Chatrapati Shahu Maharaj University)
दिल्ली विद्यापीठ (Delhi University)
देवी अहिल्ल्या विश्वविद्यालय (Devi Ahilya Vishwavidyalay)
इंदीरा गांधी शारीरिक शिक्षण आणि क्रिडा विज्ञान संस्था (Indira Gandhi Institute Of Physical Education And Sports And Science)
महर्षी दयानंद विद्यापीठ (Maharshi Dayanand University)
पंजाब विद्यापीठ (Punjab University)
मुंबई विद्यापीठ (Mumbai University)
लखनऊ विद्यापीठ (Lucknow University)
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे (Savitribai Phule University Pune)
भारतातील खासगी विद्यालये (Top Private Colleges For MPEd)
एमिटी विद्यापीठ, नोएडा (Amity University)
चंदीगढ विद्यापीठ (Chandigarh University)
डॉ. सी.व्ही. रमण विद्यापीठ (Dr. C. V. Raman University)
Intellectual Institute Of Management & Technology (IIMT University)
लव्हली व्यावयसायिक विद्यापीठ (Lovely Professional University)
सिंघानिया विद्यापीठ ( Singhania University)
स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठ (Swami Vivekanand Subharti University)
तीर्थंकर विद्यापीठ (Teerthankar university)
एनआयएमएस स्कूल विद्यापीठ ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस, (NIMS University)
महाराष्ट्रातील MPEd विद्यालये (Top MPEd Colleges In Maharashtra)
मुंबई विद्यापीठ (Mumbai University)
बॉम्बे फिजिकल कल्चर असोसिएशन शारीरिक शिक्षण महाविद्यालय, मुंबई (Bombay Physical Culture Association’s College Of Physical Education, Mumbai)
माध्यमिक प्रशिक्षण महविद्यालय, मुंबई (Secondary Training College, Mumbai)
भारती विद्यापीठ डिम्ड युनिव्हर्सिटी, पुणे (Bharti Vidyapeeth Deemed University BVDU)
भारती विद्यापीठ शारिरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे (Bharati Vidyapeeth College Of Physical Education)
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे (Chandrashekhar Agashe College Of Physical Education)
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुर (Shivaji University)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University)
साकेत कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, गोंदीया (Saket College Of Physical Education)
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती (Sant Gadge Baba Amravati Vidyapith)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड (Swami Ramanand Teerth Marathwada University)
श्री एचव्हीपी मंडळाचे शारीरिक शिक्षण पदवी महाविद्यालय, अमरावती (Shree H.V.P Mandal’s Degree College Of Physical Education)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University)
सदगुरू एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फिजिकल अँड कॉलेज ऑफ एज्युकेशन, जळगाव (Sadguru Education Society’s College Of Physical % College Of Education)
डिजिटल मार्केटिंग / Digital Marketing Information in Marathi
4) Master In Physical Education (MPED) पुर्ण केल्यानंतर करिअर संधी
शारीरिक शिक्षणात यशस्वीरित्या मास्टर डिग्री (MPED) पुर्ण केल्यानंतर करिअरच्या विविध वाटा विद्यार्थ्यांसाठी खुल्या होतात. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणामध्ये संशोधन किंवा पीएचडी करायची असेल तर MPED अभ्यासक्रम करणे आवश्यक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी MPED पुर्ण केली असेल त्याच्यासाठी काही महत्वुर्ण जॉब प्रोफाइल्सची यादी खाली देण्यात आली आहे.
योग प्रशिक्षक (Yoga Instructor)
आरोग्य प्रशिक्षक (Health Instructor)
क्रीडा व्यवस्थापक (Sports Manager)
शिक्षक (Teacher)
पंच/रेफरी (Umpire/Referee)
पत्रकार (Journalist)
शारीरिक थेरफिस्ट (Physical Therapist)
प्रशिक्षक (Coach)
फ्रीलांसर (Freelancer)
फिटनेस ट्रेनर (Fitness Trainer)
क्रीडा लेखक (Sports Writer)
सहाय्यक प्राध्यपक (Assistant Professor)
Bachelor in Physical Education (BPED) आणि Master Of Physical Education (MPED) शारीरिक शिक्षणामध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही माहीती महत्वाची असणार आहे. Physical Education हा भविष्याच्या दृष्टीने करिअरचा उत्तम पर्याय आहे. ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही चुकीचे लिहले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा दुरुस्थी करण्यात येईल.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.