Piaggio “Shiksha Se Samriddhi” Program 2023-24 / पियाजिओ “शिक्षा से समृध्दी” कार्यक्रम 2023-24

महिला विद्यार्थिनींसाठी सुवर्ण संधी. ज्या महिला विद्यार्थिनी पदवी, पदव्युत्तर आणि पदविका स्तरावर STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) या अभ्यासक्रमाला शिकत असतील त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती लाभदायक ठरणार आहे

पियाजिओ व्हाइकल्स प्रा. लि. Piaggio Vehicles Pvt. Ltd.

पियाजिओ व्हाइकल्स प्रायव्हेट लिमीटेड ही भारतातील एक अग्रणी 3-चाकी मालवाहतूक निर्मीण करणारी कंपनी आहे. पियाजिओ कंपनी डिझेल, पेट्रोल, सिएनजी आणि एलपीजी इंधन प्रकारांमध्ये तीन चाकी वाहन निर्मीत करणारी वाहतूक उध्योगातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीच्या वाहनांचा दर्जा उत्तम असल्यामुळे कंपनीची उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सुध्दा पियाजिओ कंपनीच्या वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळेच जगभरातील 50 हून अधिक देशांमध्ये वाहनांची निर्यात केली जाते.

पियाजिओ कंपनीच्या CSR उपक्रमाचा एक भाग म्हणून, कंपनीने पियाजिओ “शिक्षा से समृध्दी” कार्यक्रम 2023-24 महिला विद्यार्थिनींसाठी राबवला आहे. कोणतीही विद्यार्थिंनी आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे शिक्षणापासून वंचीत राहता कामा नये हा शिष्यवृत्तीमागचा महत्वाचा उद्देश आहे. तसेच, कंपनीच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी इतर CSR उपक्रम देखील घेत आहे.

Piaggio “Shiksha Se Samriddhi” Program 2023-24

पात्रता

• शिष्यवृत्ती फक्त महिला विद्यार्थिनींसाठी असणार आहे.
• पुढील जिल्ह्यांमधील विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. पुणे, सातारा, बारामती, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि अहमदनगर.
• ज्या विद्यार्थिनी STEM (Science, Technology, Engineering and Mathematics) या अभ्यासक्रमाला शिकत आहेत. त्या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
• पदवी, पदव्युत्तर आणि डिप्लोमामध्ये नोंदणी केलेले आणि अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थिनी पात्र असतील.
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनीला मागील वर्गात 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले असतील तर पात्र.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थिनीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 4 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे.

अपात्रता

• शिष्यवृत्ती फक्त महिला विद्यार्थिनींसाठी असणार आहे.
• पुढील जिल्ह्यांमधील विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. पुणे, सातारा, बारामती, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि अहमदनगर.
• ज्या विद्यार्थिनी STEM (Science, Technology, Engineering and Mathematics) या अभ्यासक्रमाला शिकत नाहीत त्या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.
• पदवी, पदव्युत्तर आणि डिप्लोमामध्ये नोंदणी न केलेले आणि अंतिम वर्षाला नसणाऱ्या विद्यार्थिनी अपात्र असतील.
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनीला मागील वर्गात 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले असतील तर संबंधीत विद्यार्थिनी अपात्र असेल.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थिनीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 4 लाखांपेक्षा जास्त असेल तर संबंधीत विद्यार्थिनी अपात्र असणार आहे.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत

• पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
• मागील वर्गाची मार्कशीट
• पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड)
• कौटुंबींक उत्पन्नाचा पुरावा जसे की पगाराच्या स्लिप, संबंधित सरकारी प्राधिकरणाचे उत्पन्न प्रमाणपत्र इ.
• STEM अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला पुरावा (कॉलेज/ शालेय ओळखपत्र, शैक्षणिक शुल्काची पावती)
• अर्जदाराचे किंवा पालकांचे बँक खाते तपशील.

फायदा काय होणार
ज्या विद्यार्थिनींची या शिष्यवृत्तीसाठी निवड होईल. त्या विद्यार्थिनी 15 ते 20 हजार रु पर्यंत शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.

अर्ज करण्यासाठी अंतीम मुदत
07 जानेवारी 2024

अर्ज करण्यासाठी लिंक
Piaggio “Shiksha Se Samriddhi” Program 2023-24

Leave a comment