Rice Plantation – वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भात लावणीची लगबग, पहा Photo

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भात (Rice Plantation) लावणीच्या कामांना वेग आला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या भागात ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे. गाणी म्हणत, एकमेकांना मदत करत, शेताच्या बांधावर जेवण करत महिला, पुरुष आणि मुलं सुद्धा भात लावणीच्या कामात कुटुंबातील सदस्यांना मदत करता आहे. वाई तालुक्याच्या पश्चिम भागात चिखली, बोरगांव, वयगांव, दह्याटसह सर्वच गावांमध्ये भात लावणीची कामे वेगात सुरू आहेत.