सामना पाहायला आला आणि नशीब फळफळलं; एका हातात झेल घेताच चाहता झाला कोट्याधीश! पाहा Video

स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असतो. टी20 क्रिकेटची फटकेबाजी स्टेडियममध्ये जाऊन अनुभवण्यासाठी चाहत्यांची लगबग पाहायला मिळते. असाच उत्साह SA T20 लीगमध्ये पाहायला मिळत आहे. एमआय कॅपटाऊन आणि डर्बन सुपय जायंट्स हा सामना पाहण्यासाठी आलेला एक चाहता एका झेलमुळे कोट्याधीश झाला आहे. जवळपास 1.8 कोटी रुपये त्याला बक्षीस म्हणून मिळाले आहेत.

 

एमआय केपटाऊन आणि डर्बन सुपर जायंट्स सामन्यात फलंदाजांनी अक्षरश: चौकार आणि षटकारांची तुफान आतषबाजी केली. दोन्ही संघांनी मिळून 449 धावा चोपून काढल्या. केपटाऊनचा सलामीवीर रायन रिकेल्टनने 65 चेंडूंमधअये 113 धावांची वादळी खेळी केली. त्याची फटकेबाजी सुरू असतानाच सामन्याच्या 14 व्या षटकातील चौथ्या चेंडूंवर त्याने षटकार ठोकला. चेंडू थेड प्रेक्षक गॅलरीत गेला आणि यावेळी उपस्थित एका चाहत्याने हा झेल एका हातात पकडला. या झेलमुळे हा चाहता अवघ्या काही सेकंदात कोट्याधीक्ष झाला. त्याला 2 दशलक्ष रँड बक्षीस म्हणून मिळाले. म्हणजेच भारतीय 1.8 कोटी रुपये.

SA T-20 स्पर्धेच्या नियमानुसार, एखाद्या चाहत्याने एका हातात क्लीन कॅच पकडला, तर त्याला बक्षीस स्वरुपात मोठी रक्कम दिली जाते.

error: Content is protected !!