सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये गोंगावणारं मराठ्यांच वादळ म्हणजे Santaji Ghorpade. संताजी आणि धनाजी आला असं म्हणताच औरंगजेबाच्या सुद्धा काळाजाचा ठोका चुकायचा. इतकी भयान दहशत संताजी आणि धनाजी जाधव यांची होती. दोघेही गमिनि कावा (गुरिल्ला युद्धा) पद्धतीने दुष्मनांना सळो की पळो करून सोडत होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि पुढे राजाराम महाराज यांच्यासाठीही त्यांनी मर्दुमकी दाखवत गनीमांना मराठ्यांचा हिसका दाखवला. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी स्वराज्य आणि स्वराज्याच्या सेवेसाठी निष्ठेने आणि निस्वार्थपणे खर्ची घातले. या ब्लॉगमध्ये संताजी घोरपडे यांच्या आयुष्याची काही पान उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. चला तर जाणून घेऊन मराठ्यांच्या योद्ध्याचा संघर्ष.
Santaji Ghorpade आणि इतिहास
सरसेनापत संताजी घोरपडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भाळवणी येते इ.स 1645 साली झाला. भाऊबीजेच्या दिवशी घोरपडेंच्या घरात स्वराज्याचा सेनापती जन्माला आला. त्यामुळे घोरपडे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. औंधच्या यमाई/संताई देवीच्या नावावरून त्यांचे नाव संताजी असे ठेवण्यात आले. देवीच्या आशीर्वादाने मराठ्यांचा सेनापती जन्माला आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि स्वराज्याचा भगवा डोळ्यासमोर ठेवत संताजींनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं.
संताजी घोरपडे 1689 ते 1697 या काळात सरसेनापती होते. संताजी घोरपडे यांनी धनजी जाधव यांच्यासोबतीने जवळजवळ 17 वर्ष मुघल सैन्याला कडवी झुंज देत त्यांच्या तोंडच पाणी पळवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू झाल्यानंतर. स्वराज्याची घडी काही अंशी विस्कटली होती. स्वराज्याची पुनर्बांधणी करण्याचा विडा राजाराम महाराज यांनी उचलला होता. या काळात राजाराम महाराजांनी सरसेनापतीपदाची वस्त्रे मामलकत मदार हे भुषण स्वरुपी पद व काळ्या पांढऱ्या रंगाचा झेंडा संताजी म्हाळोजी घोरपडे यांच्या हवाली करत त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली.
Daulatmangal fort – माता पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी या गडावर नृत्य केलं होतं, जाणून घ्या सविस्तर…
स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर स्वराज्याची घडी विस्कटली होती. खजाना नव्हता, सैन्याची कमतरता होती. अशा परिस्थितीत सरसेनापती संताजी घोरपडे यांनी मुघलांना मराठ्यांचा दणका दाखवला आणि हिंदवी स्वराज्याची पुनर्बांधणी केली. संताजी घोरपडे यांचा हा पराक्रम मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवला गेला. प्रवास कितीही जास्त असो संताजी त्याला कमीत कमी वेळेत पूर्ण करायचे. मुघलांच्या अनेक सेनापतींना संताजींनी मराठ्यांचा हिसका दाखवला होता. दिल्ली ते पुणे हे अंतर त्यांनी घोड्यावरून अवघ्या आठ तासात पार केल्याचे सांगितले जाते.
राजाराम महाराजांनी पंचहजारी (5000 सैनिक) सेनापती पद दिल्यानंतर संताजींनी धनाजी जाधवांच्या सोबतीने मुघलांना अस्मान दाखवले. संताजी यांनी धनाजी जाधव यांच्या सोबत अनेक युद्ध केली. इ.स 1689 ते 1696 हा काळ संताजी आणि धनाजी जाधव यांनी गाजवला. या काळात मुघलांची अक्षरश: झोप कोणी उडवली असेल तरी, तरी संताजी आणि धनाजी या नावाने. औरंगजेब सुद्धा संताजी आणि धनाजी आले अस म्हणताच थरथर कापायचा.
korigad fort – कोळ्यांचा कोरीगड, वाचा गडाचा सविस्तर इतिहास…
पन्हाळ्यावर वाईट नजर ठेवणारा औरंगजेबाचा सेनापती शेख निजाम याचा काटा काढत त्याचे हाथी-घोडे संताजींनी ताब्यात घेतले होते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकातही संताजी आणि धनाजी या नावाच वादळ गोंगावत होत. संताजी आणि धनाजी यांनी मुघलांचे सेनापती कासिम खान, अलिमर्दान खान, शेख निझाम यांचे पानिपत केले होते. तसेच देसूर येथील मुघलांचा खजिना, शस्त्र आणि पशुधन लुटून मुघलांच्या तोंडच पाणी पळवलं होतं. यांच्या व्यतिरिक्त अनेक मुघल सैनिकांना संताजी आणि धनाजी यांनी ढगात पाठवलं. आपल्या नावाची दहशत संताजी आणि धनाजी यांनी निर्माण केली होती.
संताजी आणि पराक्रम
आपल्या पराक्रमाने संताजींना अनेक मुघलांना अस्मान दाखवत त्यांना यमसदनी धाडले. 1674 साली सुरू झालेला संताजींचा प्रवास 1697 पर्यंत कायम होता. संताजींना सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 साली सैन्यात पागेलचा जूमलेदार या हुद्यावर रुजू करून घेतले होते. स्वराज्यात सामील झाल्यानंतर संताजींना आपल्या पराक्रमाने सर्वांना प्रभावित केले होते. स्वराज्यासाठी लढायची पहिली संधी संताजींना 1677 साली मिळाली. कोप्पळ प्रांतात कासिमखान व हुसेनखान या मियाणा बंधूंशी मराठ्यांची लढाई झाली. या लढाईत संताजींनी पराक्रम गाजवला. यानंतर अनेक लढायांमध्ये संताजी नावाच वादळ सतत गोंगावत होतं.
इ. स 1679 साली जालनाची स्वारी, 1681 मध्ये कर्नाटक प्रांतात मोहीम आखून पठाव व बोरडांचा पराभ करत अनेक ठाणी स्वराज्यात सामील करून घेतली. त्यांच्या या पराक्रमामुळे छत्रपती संभाजी महाराज प्रभावित झाले आणि त्यांचा सन्मान करण्यात आला. संताजी आणि धनाजी नावाच वादळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये दिवस रात्र गोंगावत होतं. ऑगस्ट 1689 साली श्रावणी बैल पोळ्याच्या दिवशी औरंगजेबाची तुळापूर येथे छावणी पडली होती. याच संधीचा फायदा घेत संताजींना छावणीवर हल्ला केला आणि सोन्याचे कळस कापून काढले. विशेष म्हणजे संताजी आणि धनाजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धविषयक नियमांचा पुरेपूर आदर केला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व सैन्याला सक्त आदेश दिले होती, की धार्मिक पुजा अर्चा करत असताना कोणास मारू नये. या आदेशाचे पालन करत संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबास कोणतीही इजा पोहचवली नाही. मात्र, छावणीचा कळस कापून मुघलांच्या ह्रदयात आपल्या नावाची धडकी भरवण्यात ते यशस्वी ठरले. तुळापूर मोहिम फत्ते करून आल्यानतंर रायगडास वेढा घालून बसलेल्या इतिकाद खानावर हल्ला करत संताजी आणि धनाजींनी त्यालाही पळवून लावले होते. ऑक्टोबर 1689 साली बेन्नूरच्या राणीवर चालून जाणाऱ्या जान निसारखान, मतलबखान, शर्जाखान यांना संताजींना मराठ्यांचा दणका धाकवला आणि त्यांना पराभूत केले. बेन्नुरच्या राणीची सुरक्षा करून संताजींनी पराक्रम गाजवला. सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.
इ.स 1690 नंतर संताजी आणि धनाजी या जोडगोळीने मिळून मुघलांच्या सैन्यावर अनेकवेळा आक्रमण करून त्यांचा पराभव केला. साताऱ्यात शर्जाखान, म्हसवडमध्ये लुफ्तुल्लाखानाची छावणी आणि ऑगस्ट 1690 साली कसबे नांदगज, परगणे, कडेवली येथील गढ्यांवर हल्ला करून उद्ध्दस्त केल्या. त्यांच्या याच पराक्रमामुळे 1691 साली संताजींची सरसेनापती पदावर नियुक्ती करण्यात आली. सरसेनापतीपद स्वीकारल्यानंतर संताजींनी अधिक जोमाने कामाला सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात त्यांनी बेळगांव, धारवाड प्रदेशात धुमाकूळ घातला होता.
Bapu Biru Vategaonkar – आया बहिणींना त्रास देणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणारा कृष्णेचा वाघ
सरसेनापतीपद स्वीकारल्यानंतर संताजी घोरपडे यांनी जाननिसारखान, तहव्वुरखान, कांचीचा फोजदार अलिमर्दखान, जुल्फकारखान, कासीमखान, हिंमतखान, चैत्रसाल राठोड यांना पराभव करत स्वराज्याचा झेंडा अगदी थाटात डौलत ठवेला. 20 जानेवारी 1696 साली बसवापट्टाणच्या लढाईत हिंमतखानाला संताजींना शेवटचा इंगा दाखवत त्याला ठार केले. संताजींना आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक वेळा मुघलांचा पराभव केला. संताजी-घनाजी आले असं म्हणताच मुघलांचा सैन्य थरथर कापायचं. संताजींना लढाईत पराभव करणे कोणालाच शक्य नव्हत त्यामुळे फितुरीने त्यांना पकडण्यात आले.
राजाराम महाराज आणि संताजी यांच्यात वाद
संताजी रणभुमीवर जेविढ्या आक्रमकतेने शत्रू सैन्यावर तुटून पडत असत तितकीच उग्र स्वरुपाच त्यांच बोलणं होतं. यामुळे राजाराम महाराज आणि त्यांच्याच मिठाचा खडा पडला. त्यांच्याच झालेला वाद विकोपाला गेला. तेव्हा राजाराम महाराजांनी संताजींच्या जागी धनाजी जाधव यांची नवीन सैन्य प्रमुख म्हणून नियूक्ती केली होती. त्यामुळे संताजींना राग अनावर झाला. याच दरम्यान, राजाराम महाराजांनी धनजींना संताजीवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. संताजींना या लढाईत धनाजींचा पराभव केला होता.
19 जून 1697 साली इस्लामपूर येथील महादेवाच्या मंदिराजवळ असलेल्या ओढ्यात आंघोळ करून संताजी ध्यानस्थ बसले होते. मात्र, फितुरीमुळे संताजींना पकडण्यात आले आणि त्यांचा खून करण्यात आला. संताजी घोरपडे म्हणजे निष्ठावंत, शौर्यवंत, डावपेचात तरबेज, गणिमांचा कर्दनकाळ होय. सैन्यावर तुटून पडणारे संताजी राजाकारणाच्या आखाड्यात मात्र मागे पडले. गलिच्छ राजकारणाचा ते बळी ठरले. मात्र, त्यांच्या पराक्रमाची दखल आजही घेतली जाते. मराठा साम्राज्याच्या वीर योद्ध्यांमध्ये त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते.
संताजी धोरपडे यांनी जीवाची बाजी लावत अनेक वेळा स्वराज्यावर चालून आलेले संकट आपल्यावर घेत शत्रूला धुळ चारली. मात्र, या वीर योद्ध्याची समाधी उघड्यावर आहे. कुरुंदवाड घाट येथे पंचगंगा-कृष्णा नदीच्या संगमावर संताजी घोरपडे यांची समाधी आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.