सातारा (satara Vishesh) जिल्ह्यात यंदाचा गणेशोत्सव बऱ्यापैकी पर्यावरणपूरक झाला. अनेक गावांनी पुढाकार घेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच विसर्जन सुद्धा नदीमध्ये न करत विहिरीमध्ये करण्यास प्राधान्य दिले. या उपक्रमात अनेक मंडळांनी सुद्धा हिरहिरीने सहभाग नोंदवला होता. मंडळांना प्रोत्सोहान देण्यासाठी राज्य स्तरावर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याचे निकाल जाहीर करण्यात आले असून जिल्हा स्तरावर पहिला क्रमांक सातारा तालुक्यातील नागठाने गावच्या अभय कला व क्रीडा गणेशोत्सव मंडळाने पटकावला आहे.
या स्पर्धेत राज्यस्तरीय पहिला क्रमांक पटकावणाऱ्या मंडळाला 7, 50, 000 रुपये, द्वितीय पुरस्कार पटकावणाऱ्या मंडळाला 5 लाख आणि तृतीय पुरस्कार पटकावणाऱ्या मंडळाला 2,50,000 रुपये दिले जाणार आहेत. तसेच जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना 50 हजार, द्वितीय विजेत्यांना 40 हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला 30 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर तालुकास्तरीय विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मडळाला 25 हजार रुपये पारितोषिक स्वरुपात दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील एकूण 12 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.
सातारा जिल्ह्यातील विजेत्या मंडळांची नावं पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक – अभय कला व क्रिडा गणेशोत्सव मंडळ, नागठाने (ता.सातारा)
द्वितीय क्रमांक – सार्वजनिक गणेशोत्सव महोत्सव “क” वर्ग तीर्थक्षेत्र नरवणे (ता.खटाव)
तृतीय क्रमांक – भिमाशंकर गणेशोत्सव मंडळ, आर्वी (ता. कोरेगाव)
तालुकास्तरीय पारितोषिक तीन मंडळांमध्ये विभागून देण्यात आले आहे. या तीन मंडळांमध्ये पुढील मंडळांचा समावेश आहे.
1) रणसग्रांम मित्रपरीवार,वेळे, ता. वाई
2) श्री सावळेश्वर युवा गणेशोत्सव मंडळ, महादेव मंदीर, पुसेसावळी
3) संगम गणेश मंडळ,गांधी चौक, तांबवे
राज्यात प्रथम क्रमांक पटवाणारी मंडळे
प्रथम क्रमांक – तिरंगा गणेशोत्सव मंडळ, खानापूर (सांगली)
द्वितीय क्रमांक – वसुंधरा वृक्षारोपी गणेशोत्सव मंडळ (लातूर)
तृतीय क्रमांक – सुवर्णयोग तरुण मंडळ, पाथर्डी (अहिल्यानगर)
राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार, 25 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते विजेत्या मंडळांचा पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.