Shrawan Somvar – श्रावणसरी आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेला विसापूरचा महादेव

Shrawan Somvar मुंबई-पुणे या महामार्गाच्या अगदीच शेजारी असणाऱ्या विसापूर गडाची तटबंदी महामार्गावरून अगदी सहजच नजरेस पडते. त्यामुळे या गडावर जाण्याचा मोह टाळता येत नाही. लोणावळ्याच्या कुशीत असलेला हा गड पावसाळी वातावरणात दुर्गप्रेमींना आकर्षीत करतो. मावळ तालुक्यात मोडणारा हा Visapur Fort खंडाळा म्हणजेच बोर घाटाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता.

लोहगड आणि विसापूर या दोन गडांवर बोर घाटाच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी होती. आता श्रावण महिना सुरू असून गडाच्या सुंदरतेत अधीकची भर पडली आहे.

गडावर असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात शांतता अनुभवण्यासारखी आहे.

महादेवाच मंदिराच्या आसपासच्या परिसरात थोडा वेळ बसल्यावर मन अगदी प्रसन्न आणि सकारात्मक होऊन जातं. 

विसापूर किल्ल्याची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

Visapur Fort – दुर्गप्रेमींच्या आवडीचा लोणावळ्याच्या कुशीत वसलेला विसापूर, एकदा आवर्जून भेट द्या