Tata Capital Pankh Scholarship 2023-24 / टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती २०२३-२०२४

जे विध्यार्थी सध्या B.Com, B.Sc, BA. पदवीपूर्व पदवीच्या अभ्यासक्रमाला शिकत आहेत. तसेच इयत्ता ११ वी आणि १२ वी मध्ये शिकणारे आणि डिप्लोमा/पॉलिटेक्निक अभ्यासक्रम शिकणारे विध्यार्थ्यांसाठी Tata Capital Pankh Scholarship किंवा टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती अंतर्गत हा शिष्यवृत्ती प्रोग्राम आहे. टाटा कॅपिटल लिमिटेड आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू आणि हुशार विध्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून विध्यार्थ्यांच्या पंखांमध्ये शिक्षणाच बळ देणे हा शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा मुख्य हेतु आहे. या Tata Capital Pankh Scholarship कार्यक्रमांतर्गत विध्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण शुल्काच्या ८० टक्के पर्यंत किंवा १० ते १२ हजार रु. शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल. विध्यार्थ्यांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी Tata Capital Pankh Scholarship कार्यक्रम मुख्य भूमिका बजावणार आहे.

Tata Capital Pankh Scholarship / टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती. Scholarship for class 11 and scholarship for class 12

पात्रता

• फक्त भारतातील विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने मागील वर्गात किमान ६० टक्के गुण मिळवलेले असावेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून २.५ लाख रु. किंवा त्यापेक्षा कमी आसवे.

अपात्रता

• भारताबाहेरील विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरतील.
• अर्ज करणारा विध्यार्थी जर मागील वर्गात किमान ६० टक्के गुण मिळवण्यात अयशस्वी ठरला तर संबधीत विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरू शकतो.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून २.५ लाख रु. पेक्षा जास्त असेल तर संबधीत विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरू शकतो.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत ?

• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
• एक ओळखीचा पुरावा (आधार कार्ड)
• चालू शैक्षणिक वर्षाच्या फीची पावती.
• आधीच्या वर्गाची मार्कशीट किंवा ग्रेड कार्ड.
• प्रवेशाचा पुरावा (शाळा/महाविध्यालयीन ओळखपत्र/ बोनफाईड प्रमाणपत्र ई.)
• उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म १६A / सरकारी प्राधिकरणाने जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र / पगार स्लिप्स ई/)
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे बँक खाते तपशील (ब्लॅंक चेक किंवा पासबूक प्रत)
• अपंगत्व आणि जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

Tata Capital Pankh Scholarship चा फायदा काय होणार ?

शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विध्यार्थ्याला ८० टक्के पर्यंत शिक्षण शुल्क किंवा १० हजार रु मिळतील.

हे लक्षात ठेवा

• २०२३-२४ साठी हा एक-वेळचा शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे आणि या शिष्यवृत्तीच्या नूतणीकरणासंबंधी निर्णय टाटा कॅपिटल वर अवलंबून आहे.
• फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा आणि फॉर्म भरून झाल्यावर दोन वेळा चेक करा

Tata Capital Pankh Scholarship / टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती. Scholarship for undergraduate students in India / Scholarship For Diploma Students

पात्रता

• फक्त भारतातील विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र.
• जे विध्यार्थी सध्या पदवीपूर्व पदवीच्या अभ्यासक्रमाला शिकत आहेत जसे की B.Com, B.Sc, BA इत्यादी किंवा भारतातील मान्यताप्राप्त संस्थांमधील डिप्लोमा / पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेला आहे असे विध्यार्थी अर्ज करू शकतात.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने आधीच्या वर्गात किमान ६० टक्के गुण मिळवलेले असावेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबीक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून २.५ लाख रु किंवा त्यापेक्षा कमी असावे.

अपात्रता

• भारताबाहेरील विध्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
• ज्या विध्यार्थ्यांच ग्रॅजुएशन पूर्ण झाल आहे असे विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याला मागील वर्गात किमान ६० टक्के गुण मिळवता आले नाही तर संबधीत विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरेल.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबीक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून २.५ लाख रु. पेक्षा जास्त असेल तर संबधीत विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत ?

• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
• एक ओळखीचा पुरावा (आधार कार्ड)
• चालू शैक्षणिक वर्षाच्या फीची पावती.
• आधीच्या वर्गाची मार्कशीट किंवा ग्रेड कार्ड.
• प्रवेशाचा पुरावा (शाळा/महाविध्यालयीन ओळखपत्र/ बोनफाईड प्रमाणपत्र ई.)
• उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म १६A / सरकारी प्राधिकरणाने जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र / पगार स्लिप्स ई/)
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे बँक खाते तपशील (ब्लॅंक चेक किंवा पासबूक प्रत)
• अपंगत्व आणि जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

Tata Capital Pankh Scholarship चा फायदा काय होणार ?

शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विध्यार्थ्याला ८० टक्के पर्यंत शिक्षण शुल्क किंवा १२ हजार रु मिळतील.

हे लक्षात ठेवा

• २०२३-२४ साठी हा एक-वेळचा शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे आणि या शिष्यवृत्तीच्या नूतणीकरणासंबंधी निर्णय टाटा कॅपिटल वर अवलंबून आहे.
• फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा आणि फॉर्म भरून झाल्यावर दोन वेळा चेक करा

अर्ज करण्याची अंतिम मुदत
१५ नोव्हेंबर २०२३

अर्ज करण्यासाठी पूढील लिंक ओपन करा
Tata Capital Pankh Scholarship / टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती. Scholarship for college students / Scholarship for class 11 and scholarship for class 12 / Scholarship for undergraduate students in India / Scholarship For Diploma Students

Leave a comment