५० हजार रुपये आर्थीक सहाय्य बाबा गुरबचन सिंग शिष्यवृत्ती २०२३-२४ / Baba Gurbchan scholarship 2023-24 /

५० हजार रुपये आर्थीक सहाय्य बाबा गुरबचन सिंग शिष्यवृत्ती २०२३-२४. संत निरांकारी मंडळाच्या शिक्षण विभागाकडून अभियांत्रिकी पदविका किंवा विशिष्ट पदवी अभ्यासक्रमाला शिकत असलेल्या गुणवंत विध्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती फायदेशीर ठरणार आहे. ज्या विध्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड होईल अश्या गरजू विध्यार्थ्यांना ५० हजार रु. अर्थीक सहाय्य किंवा ट्यूशन फी / वार्षिक शुल्क मिळेल.

संत निरंकारी मंडळ ही एक निरंकारी अध्यात्मीक संस्था आहे जी भारतातील गरजू, हुशार आणि गुणवंत विध्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेते.

बाबा गुरबचन सिंग शिष्यवृत्ती २०२३-२४ / Baba gurbchan scholarship 2023-24

scholarship for degree students तुम्हाला जर या शिष्यवृत्तीसाठी पात्र व्हायच असेल तर

पात्रता scholarship for degree student

• अभीयांत्रिकीचा डिप्लोमा किंवा भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून खालीलपैकी एका अभ्यासक्रमाला शिकत असणारे विध्यार्थी.
• जस की BA / BA (Hons), B.com / B.com (Hons), B-Pharma, D-Pharma, B.Ed, DElAD, B.Sc in Hotel Management, BBA, BCA, M.Com, M.A, MCA तसेच कोणत्याही खेळातील डिप्लोमा / पदवी किंवा प्रशिक्षण, वाद्य, संगीत / गायन
• शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरायच असेल तर १० वी आणि १२ वी मध्ये किमान ६० टक्के गुण मिळाले असले पाहिजेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ३,५०,००० रु पेक्षा कमी असल पाहिजे.

खाली दिलेले अपात्रतेचे नियम ज्या अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्यांना लागू होतील ते विध्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेंत्तर्गत मिळणाऱ्या अर्थीक सहाय्यासाठी पात्र ठरणार नाहीत.

• ज्या विध्यार्थ्यांनी व्यवस्थापन / संयोजक कोट्यातून किंवा विध्यापीठ / शैक्षणिक संस्थेच्या इतर कोणत्याही कोट्यातून प्रवेश घेतला असेल.
• मागील सेमिस्टर किंवा वर्षामध्ये कोणत्याही विषयात अनुतीर्ण झालेले विध्यार्थी.
• जर एखाद्या विध्यार्थ्याला अभ्यासक्रमाच्या कोणत्याही अनुशासनीय कृत्यासाठी विध्यापीठ किंवा संस्थेकडून दंड लावला असेल तर असे विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.
• ज्या विध्यार्थ्याने अगोदरच इतर कोणत्याही स्त्रोताकडून शिष्यवृत्ती घेतली असेल तर संबधीत विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरेल.
• अर्ज करणारा विध्यार्थी जर रेग्युलर महाविध्यलयामध्ये जात नसेल आणि या उपस्थितीच्या कारणास्तव कोणत्याही सेमिस्टर किंवा वर्षाच्या परीक्षेला बसण्यास मनाई केली असेल तर तो विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत ? scholarship for degree student

• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराच छायाचित्र
• इयत्ता १० वी आणि १२ वी च्या मार्कशीट्स
• पे स्लिप आणि आयटीआर फॉर्म
• Affidavit (Part-III of Application Form).
• उत्तीर्ण झालेल्या सर्व सेमीस्टर परीक्षांच्या निकालांची प्रत.
• विध्यापीठ किंवा संस्थेने जारी केलेल्या नवीनतम फी पावतींची प्रत.
• ट्यूशन फी, लायब्ररी, वसतिगृह, पुस्तके इत्यादींसह तपशीलवार फी सरंचनेवर संस्थेच्या प्रशासक किंवा मुख्यधापकांनी रितसर स्वाक्षरी केलेली असावी.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याच्या पासबुकची प्रत.
• कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बँक स्टेटमेंटची प्रत.
• विध्यापीठ / शैक्षणीक संस्थेद्वारे प्रदान केलेली प्रवेश स्लिप पत्र
• आधार कार्ड / रेशन कार्ड / मतदार ओळखपत्र / पासपोर्ट / पॅन कार्डची प्रत.
• शिक्षण विभाग, SNM कडून मागील वर्षी मिळालेल्या पत्राची प्रत (फक्त जुन्या विध्यार्थ्यांसाठी).

शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्यावर फायदा काय होणार. scholarship for degree student

शिष्यवृत्तीसाठी यशस्वीरित्या पात्र ठरल्यावर विध्यार्थ्यांना प्रती विध्यार्थी ५० हजार रु. वार्षिक आर्थीक सहाय्य किंवा शिक्षण शुल्क किंवा वार्षिक शुल्क यापैकी जे कमी असेल ते दिले जाईल.

अर्ज करण्याची अंतिम मुदत
३० नोव्हेंबर २०२३

दोन प्रकारे अर्ज करू शकता

पूढील लिंक ओपन करा – बाबा गुरबचन सिंग शिष्यवृत्ती २०२३-२४ / Baba gurbchan scholarship 2023-24

किंवा

पूढील पत्त्यावर पोस्टाद्वारे अर्ज पाठवू शकता

सदस्य प्रभारी,
शिक्षण विभाग
संत निरंकारी प्रशासकीय ब्लॉक,
निरंकारी चौक, बुरारी रोड,
दिल्ली – ११०००९, भारत

Leave a comment