Tennis Cricket Marathi – निखील जाधवची वादळी खेळी! षटकारांचा पाडला पाऊस, 28 चेंडूंत ठोकलं शतक; पाहा Video

Tennis Cricket Marathi

केएसकेचा कोहिनूर हिरा आणि गिरगांवचा वंडर बॉय म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या निखील जाधवने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवून दिला आहे. काही दिवसांपूर्वी भिवंडीतील मानकोलीमध्ये खेळल्या गेलेल्या पावसाळी क्रिकेट स्पर्धेत Tai Packers RJ या संघाकडून खेळताना त्याने 28 चेंडूंमध्ये 104 धावांची विस्फोटक खेळी केली आहे. पहिल्या चेंडूंपासून गोलंदाजांवर तुटून पडलेल्या निखीलने गोलंदाजांना अक्षरश: चोपून काढलं. त्याने 317 च्या स्ट्राईकरेटने 13 खणखणीत षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने शतक ठोकलं आहे. तसेच त्याने नाबाद 114 धावांची खेळी करत सर्वांनी मन जिंकली.

Krishna Satpute – Tennis Cricket मध्ये गोंगावणारं कुर्डूवाडीच वादळ, वाचा God Of Tennis Cricket चा संघर्ष…