Tennis Cricket विश्वावर शोककळा, संगमनेरचा हुकमी एक्का शेखर शेळकेच अपघाती निधन

टेनिस क्रिकेट (Tennis Cricket) विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या शेखर शेळकेच अपघाती निधन झालं आहे. संयमी आणि विस्फोटक फलंदाजीमुळे त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ या नावाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळखलं जात होतं. त्याच्या निधनामुळे संगमनेर तालुक्यासह टेनिस क्रिकेट विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

शेखर शेळके संगमनेर तालुक्यातील बोटा गावाचा रहिवासी होती. क्रिकेटची प्रचंड आवड असणाऱ्या शेखरने अनेक स्पर्धांमध्ये आपल्या फलंदाजीची जादू दाखवून दिली होती. त्याचा रिव्हर्स फटका पाहण्यासारखा होता. अनेकवेळा त्याने आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता. त्यामुळे फक्त संगमनेर तालुक्यातच नाही तर टेनिस क्रिकेट विश्वात त्याने आपल्या नावाचा डंका वाजवला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर येथून आपल्या बोटा या गावी परतत असताना टाकळी ढोकेश्वर येथे त्याचा अपघात झाला. त्यानंतर त्याला तात्काळ अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेखर शेळकेच्या निधनामुळे एक हरहुन्नरी खेळाडू क्रिकेट विश्वाला मुकल्याची भावना चाहत्यांमधून व्यक्त केली जात आहे.

Tennis Cricket Marathi – शेखर शेळकेची विस्फोटक फलंदाजी तुम्ही पाहिलीये का? 21 चेंडूत चोपल्या होत्या 62 धावा; पाहा Video