गणेशोत्सवाचे औचित्य साधून वाई तालुक्याच्या (Wai News) पश्चिम भागात पहिल्यांदाच भव्य आणि शिस्तबद्ध स्वरूपात ‘दह्याट अल्ट्रा रन’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तरुण पिढी व्यसनापासून दूर राहावी, प्रत्येकाने आपल्या आरोग्याप्रति जागरूक राहावे आणि गावातील सामाजिक संघटन अधिक बळकट व्हावे, या उदात्त उद्देशाने ‘जन्नीदेवी कला व क्रीडा मंडळ, दह्याट (मुंबई) नोंदणीकृत’ व ग्रामस्थ मंडळ दह्याट यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा 17 सप्टेंबर रोजी अत्यंत उत्साहात पार पडली.
सकाळी 7 वाजता श्रीराम मंदिर, दह्याट येथून स्पर्धेचा शुभारंभ झाला. या प्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल बोरगावचे अध्यापक अजित वाडकर सर, गावचे सरपंच आनंदा गणपत धनावडे, मंडळाचे अध्यक्ष विलास (काका) धनावडे, पश्चिम भागातील संवेदनशील युवा नेतृत्व गणेश तुकाराम वाडकर, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर कोंडीबा धनावडे, उद्योजक विजय नारायण धनावडे, वैभव कृष्णा वाडकर, विजय श्रीपती धनावडे, अंकुश गोविंद धनावडे, विलास महाराज यादव यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या मॅरेथॉनमध्ये 10 किमी, 5 किमी आणि 3 किमी अशा तीन वेगवेगळ्या गटांमध्ये तरुणांनी व ग्रामस्थांनी आवेशाने सहभाग घेतला.
स्पर्धेचा निकाल:
| गट (Distance) | क्रमांक | विजेत्याचे नाव | गाव | वेळ |
| 10 किमी | प्रथम | रोशन दत्तात्रय धनावडे | दह्याट | ५० मिनिटे |
| 10 किमी | द्वितीय | अक्षय आनंदा धनावडे | दह्याट | ५९ मिनिटे |
| 5 किमी | प्रथम | गजानन नारायण धनावडे | दह्याट | २६ मिनिटे |
| 5 किमी | द्वितीय | पवन गणेश धनावडे | दह्याट | ३० मिनिटे |
| 3 किमी | प्रथम | वेदांत सुरेश जाधव | परतवडी | १९ मिनिटे |
| 3 किमी | द्वितीय | आकांक्षा संतोष जाधव | व्याहळी | २२ मिनिटे |
भागात प्रथमच झालेल्या या अनोख्या क्रीडा उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात नवचैतन्य पसरले होते. सर्व सहभागी स्पर्धकांचे आयोजक जन्नीदेवी कला व क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ दह्याट यांच्या वतीने मनःपूर्वक कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.


