The Fuel Business School CSR Scholarship 2023-24 / द फ्युल बिझनेस स्कूल CSR शिष्यवृत्ती २०२३-२४

द फ्युल बिझनेस स्कूल CSR शिष्यवृत्ती २०२३-२४ scholarship for girls फ्युल म्हणजेच (फ्रेंडस यूनियन फॉर एनर्जींग लाइफ्स) चा हा एक उपक्रम आहे. आर्थिक बाजूने कमकुवत असणाऱ्या मुलींना आधार देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला पाठिंबा देणे हा शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत, फ्युल बिझनेस स्कूलमध्ये PGDM किंवा BBA प्रोग्रामच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विध्यार्थीनींना १०० टक्के पर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. या शिष्यवृत्तीमध्ये शिकवणी शुल्क, पुस्तके, कोर्सवेअर आणि स्टेशनरी उपकरने यांचा समवेश आहे.

द फ्युल बिझनेस स्कूल CSR शिष्यवृत्ती Scholarship for College Students / scholarship for girls.

पात्रता scholarship for girl

• FUEL बिझनेस स्कूलमध्ये बीबीए आणि PGDM (MBA समतूल्य) अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या विध्यार्थीनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.
• BBA साठी अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनी १२ वी बोर्ड परीक्षेत किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण असावी तरच ती या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकते.
• PGDM साठी अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनीने पदवीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळवलेले असावेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ३ लाख रु. पेक्षा कमी असावे.

अपात्रता scholarship for girl

• FUEL बिझनेस स्कूल व्यतिरिक्त इतर कोणत्याही महाविध्यालयामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विध्यार्थीनी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असतील.
• BBA साठी अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनी १२ वी बोर्ड परीक्षेत ५० टक्के पेक्षा कमी गुण मिळवले असतील तर ती विध्यार्थीनी अपात्र असेल.
• PGDM साठी अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनीने पदवीमध्ये ५० टक्के पेक्षा कमी गुण मिळवले असतील तर ती विध्यार्थीनी अपात्र असेल.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून ३ लाख रु. पेक्षा जास्त असेल तर ती विध्यार्थीनी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरेल.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत scholarship for girl

• अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनीचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थीनीचे पत्ता पुरावा म्हणूण खलीलपैकी कोणत्याही एका कागदपत्राची प्रत. (आधार कार्ड / पासपोर्ट / पत्ता आणि फोटो असलेले रेशन कार्ड / मागील ३ महिन्यांचे लाइट बिल / गाव पंचायत प्रमुख किंवा समतूल्य प्राधिकरणाने जारी केलेले पत्त्याचे प्रमाणपत्र.
• ग्रामपंचायत / वॉर्ड समुपदेशक / सरपंच / डीएम / सीओ / तहसीलदार यांनी जरी केलेला उत्पन्नाचा पुरावा.
• दहावीची मार्कशीट
• इयत्ता १२ वी आणि पदवीचे मार्कशीट (जे लागू असेल ते)
• प्रवेश परीक्षेची मार्कशीट (असल्यास)
• बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा विध्यार्थी ओळखपत्र (असल्यास)
• अनुभव किंवा इंटर्नशिप पत्र किंवा प्रमाणपत्र (लागू असल्यास)
• अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)

फायदा काय होणार ? scholarship for girl

शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विध्यार्थीनींना १०० टक्के शिष्यवृत्ती दिली जाईल ज्यामध्ये शैक्षणिक अध्यापन, शिक्षण शुल्क, पुस्तके आणि स्टेशनरी यांचा समावेश आहे.

अर्ज करण्याची अंतिम मुदत scholarship for girl
६ ऑक्टोबर २०२३

अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
द फ्युल बिझनेस स्कूल CSR शिष्यवृत्ती Scholarship for College Students / scholarship for girls. किंवा Scholarship For Girls

Leave a comment