4 लाख 20 हजाराच आर्थिक सहाय्य, द सेन्सोडाइन आयडीए शायनिंग स्टार शिष्यवृत्ती / Sensodyne IDA Shining Star Scholarship / Scholarship For Medical Students

4 वर्षांसाठी 4 लाख 20 हजाराच आर्थिक सहाय्य Haleon India, Sensodyne यांच्या भागीदारीत buddy4study आणि इंडियन डेन्टल असोसिएशनने (IDA) ही स्कॉलरशिप आणली आहे. भारतातील गुणवंत आणि गरजू विध्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा स्कॉलरशिपचा मुख्य हेतु आहे. सरकारी किंवा सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये 4 वर्षांच्या बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती फायदेशीर ठरणार आहे. Haleon India च्या CSR उपक्रमाचा भाग म्हणून सरकारी महाविध्यालये किंवा सरकारी अनुदानित महाविध्यालयांमध्ये प्रथम वर्ष BDS करत असलेल्या 57 पात्र विध्यार्थ्यांची निवड करून त्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि budd4study यांच्याद्वारे केलेल्या मूल्यांकनानंतर आणि पात्रता निकषांच्या आधारे निवडलेल्या 57 विध्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि राहणीमानाच्या खर्च देण्यात येईल. 4 वर्षांसाठी 4 लाख 20 हजाराच आर्थिक सहाय्य केल जाईल म्हणजेच प्रती वर्ष 1 लाख 5 हजार रुपये.

द सेन्सोडाइन आयडीए शायनिंग स्टार शिष्यवृत्ती / Scholarship For Medical Students

पात्रता

• संपूर्ण भारतातील विध्यार्थी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
• बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS) प्रोग्राममध्ये शिकत असणाऱ्या आणि फक्त सरकारी किंवा सरकारी अनुदानीत कॉलेजमधून प्रथम वर्षाला शिकणारे विध्यार्थी पात्र असणार आहेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने उच्च माध्यमिक शिक्षणात किमान ६० टक्के गुण मिळवलेले असावेत.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ८ लाख रु. पेक्षा कमी असावे.

अपात्रता

• भारताबाहेरील विध्यार्थी अपात्र असणार आहेत.
• जर विध्यार्थी खाजगी कॉलेजमधून BDS शिकत असेल तर तो विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहे.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याने उच्च माध्यमिक शिक्षणात ६० टक्के पेक्षा कमी गुण मिळवले असतील तर तो विध्यार्थी अपात्र असेल.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ८ लाख रु. पेक्षा जास्त असेल तर तो विध्यार्थी अपात्र असणार आहे.

कागदपत्र कोणती लागणार आहेत ?

• मागील वर्ग किंवा सेमिस्टरची मार्कशीट.
• सरकारने जरी केलेला ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/ड्रायविंग लायसन्स/पॅन कार्ड/मतदान कार्ड).
• चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती / प्रवेश पत्र / संस्थेचे ओळखपत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र)
• कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा (सरकारने जरी केलेल दस्तएवज – टॅक्स रिटर्न, स्थानिक प्रशासनाकडून मिळकत प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र)
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचे किंवा पालकांचे बँक खाते तपशील.
• अर्ज करणाऱ्या विध्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.

फायदा काय होणार ?

शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विध्यार्थ्याला शैक्षणिक आणि राहणीमनाच्या खर्चासाठी प्रती वर्ष १ लाख ५ हजार रु. मिळतील. चार वर्षांसाठी ४ लाख २० हजार रु. इतकी रक्कम मिळेल.

हे लक्षात ठेवा

• निवड झालेल्या विध्यार्थ्याला शिष्यवृत्ती नूतणीकरणाचा लाभ घेणे सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक सेमिस्टर किंवा वर्षात किमान ६० टक्के गुण प्राप्त करणे गरजेच आहे. तसेच शैक्षणिक श्रेणींचा अहवाल आणि त्यांच्या महाविध्यालयाचे चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
• शिष्यवृत्तीचा उपयोग फक्त शैक्षणिक खर्च जसे की शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, भोजन, इंटरनेट, मोबाइल, लॅपटॉप, पुस्तके, स्टेशनरी, ऑनलाइन शिक्षण इत्यादिंसाठी केला जाऊ शकतो.
• फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा आणि फॉर्म भरून झाल्यावर दोन वेळ चेक करा.

अर्ज करण्याची अंतिम मुदत
३१ ऑक्टोबर २०२

अर्ज करण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.
द सेन्सोडाइन आयडीए शायनिंग स्टार शिष्यवृत्ती / Scholarship For Medical Students

Leave a comment