Treatment for Snake Bite – सर्पदंश झाल्यावर पाच मिनिटांमध्ये होणार निदान! ‘या’ टेस्टने साप विषारी की बिनविषारी समजणार

सर्पदंश झाल्यामुळे आणि अपुऱ्या उपचारांमुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र, आता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत सर्पदंशामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी आणि तातडीच्या उपचारांसाठी ‘स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किट’ सर्व आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या टेस्टमुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये साप विषारी होता की बिनविषारी याचे निदान होणार आहे. यामुळे सर्पदंश उपचार करणे सोपे जाणार आहे. लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

काय आहे स्नेक वेनम रॅपिट टेस्ट?

  • या टेस्टमुळे रक्तातील विष कोणत्या सापाच आहे ते समजाणार 
  • सर्पदंश विषारी सापाचा होता की बिनविषारी हे समजणार
  • किटमध्ये 5 ते 10 मिनिटांत रक्तामध्ये विष आहे का नाही ते समजणार 

स्नेक टेस्ट किटची मागणी केली आहे. या किटमुळे सर्पदंशाचे लवकर निदान होणार आहे. अॅन्टी स्नेक वेनमचा वापर टाळता येणार आहे, अशी माहिती लोकमतशी बोलताना डॉ. युवराज करपे, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांनी दिली. 

error: Content is protected !!