सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून Aadhar Card Update करण्यासाठी अतिरिक्त पैसै मोजावे लागणार; वाचा…

Aadhar Card Update करण्यासाठीच्या शुल्कामध्ये UIDAI ने मोठे बदल केले आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर आता तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. आधार कार्ड अपडेट करण्याच्या शुल्कामध्ये अपडेटनुसार वेगवेगळे शुल्क आकारले जाणार आहे.

UIDAI च्या नवीन नियमानुसार पुढील प्रमाणे विविध कामांसाठी शुल्क आकारले जाणार आहे.

1) आधार कार्डवरील नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी 75 रुपये

2) फिंगरप्रिंट, बुबुळ किंवा फोटो अपडेट करण्यासाठी 125 रुपये

3) आधार कार्ड रिप्रिंट करायचं असेल तर 40 रुपये

4) पहिल्यांदात घर नोंदणी सारख्या सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर 700 रुपये आणि त्याच पत्त्यावरील प्रत्येक अतिरिक्त व्यक्तीसाठी 300 रुपये शल्क आकारले जाणार आहे.

5) 14 जून 2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन कागदपत्रे मोफत अपडेट करता येणार आहेत. मात्र, त्यानंतर या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 75 रुपये शुल्क आकारले जाईल.

6) बायोमेट्रिक अपडेट 5 ते 7 आणि 15 ते 17 वयोगटातील मुलांसाठी मोफत असणार आहेत.

7) तुम्हाला तुमचे आधार कार्ड PDF स्वरुपात पाहिजे असेल तर तुम्ही ते WhatsApp वरून MyGov Helpdesk चॅटबॉटद्वारे काही मिनिटांतच मिळवू शकता.