Wai Accident – मेणवलीत भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी, आसरे ग्रामस्थांच आर्थिक मदतीच आवाहन

वाईमधील (Wai Accident ) मेणवली येथे भीषण अपघात झाल्याने आसरे गावचे रहिवासी जगन्नाथ सणस यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करणारे साहेबराव सणस हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताने वाई तालुका हादरला असून आसरे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आसरे गावातील पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी जगन्नाथ सणस आणि ग्रामपंचायतीचे शिपाई साहेबराव सणस हे वाईला निघाले होते. वाईला जात असताना मेणवली जवळ त्यांचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात जगन्नाथ सणस यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर साहेबराव सणस हे गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईतील अपॅक्स हॉस्टपिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाई पोलीस ठाण्यात यांची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

मदतीसाठी आवाहन

या अपघातात गंभीर जखमी झालेले साहेबराव सणस यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु उपचारांचा खर्च खूप मोठा आहे. त्यामुळे आसरे ग्रामस्थांच्या वतीने आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आलं आहे. फुल न फुलाची पाकळी स्वरुपात मदत करून सहकार्य करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

मदत करण्यासाठी पुढील स्कॅनरवर स्कॅन करून आर्थिक मदत करू शकता.