वाई (Wai News) तालुक्यातील अभिजीत भोईटे यांनी प्रचंड मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर आफ्रिकेतील सर्वात उंच आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात उंच किलीमांजारो शिखर सर केलं आहे. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये सुरू झालेला प्रवास किलीमांजारो शिखरापर्यंत जाऊन स्थिरावला आहे. उणे 18 अंश सेल्सिअस तापमानातही अभिजीत यांची जिद्द गगनाला भिडणार होती.
सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या अभिजीत उल्हास भोईटे यांना लहाणपणापासूनच सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांवर भटकंती करण्याची प्रचंड आवड होती. महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरासह त्यांनी अनेक छोटी मोठी शिखरे, गड किल्ले सर केले आहेत. सह्याद्रीत सुरू झालेल्या प्रवासामुळे त्यांना मोठी स्वप्न पाहण्याच बळ मिळालं आणि किलीमांजारो शिखर सर करण्याचं ध्येय त्यांनी निश्चित केलं. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले, मेहनत केली, जाणकारांचं मार्गदर्शन घेतलं आणि आठ दिवसांच्या खडतर प्रवासानंतर त्यांनी किलीमांजारो शिखरावर तिरंगा फडकावला. दररोज आठ किलोमीटर चढाई आणि अनेक आव्हानांचा त्यांनी सामना केला. आजारी पडूनही त्यांनी हार मानली नाही आणि अखेर 5 हजार 895 मीटर उंचीवर असलेल्या किलीमांजारो शिखर त्यांनी सर केलाचं. सध्या अभिजीत भोईटे नोकरीनिमीत्त दुबईमध्ये स्थायिक आहेत.
View this post on Instagram