Wai News – रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा! कृष्णा कमंडलू ट्रस्टची रुग्णवाहिका सर्वसामान्यांच्या सेवेत

कृष्णा कमंडलू चॅरिटेबल ट्रस्ट, वाई पश्चिम (Wai News) विभाग यांच्या माध्यमातून रुग्णसेवेचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. तालुक्यातील रुग्णांना अल्पदरात व तत्पर वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने ट्रस्टतर्फे नव्या रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून आयोजित केलेला रुग्णवाहिकेचा पूजन सोहळा उत्साहात पार पडला.

रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी कोपरखैरणे, नवी मुंबई येथील सेक्टर ०५ ते ०८ मधील अण्णासाहेब पाटील उद्यान येथे हा सोहळा पार पडला. यावेळी कृष्णा कमंडलू चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी तसेच वाई पश्चिम भागातील अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना वेळेवर आणि सुलभ वैद्यकीय सेवा मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

या उपक्रमासाठी चेतना फाऊंडेशन, मुंबई तसेच शेठ गोवर्धनदास मोतीलाल मोहता चॅरिटेबल ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले. तसेच विशेष सहकार्य म्हणून श्री. प्रवीण (गणेश) नारायण वाडकर आणि श्री. पंकज आनंदा वाडकर यांचे मोलाचे योगदान राहिले. ट्रस्टच्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित होत असून भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!