Wai News – ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’; कोंढवलीत वीर जिवा महाले स्मारकाला गती! वंशजांना मदतीचा हात

वाई (Wai News) तालुक्यातील कोंढवली गावाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर अंगरक्षक वीर जिवा महाले यांच्या स्मारकाच्या उभारणीला अखेर गती मिळणार आहे. ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ या इतिहासप्रसिद्ध वाक्यामुळे अजरामर ठरलेल्या या पराक्रमी योद्ध्याच्या स्मारकासाठी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून पाच लाख रुपयांचा निधी वंशजांना सुपूर्द करण्यात आला आहे.

कोंढवली येथील वीर जिवा महाले यांचे १४ वे वंशज प्रकाश सपकाळ यांची अत्यंत हालाखीची परिस्थिती समोर आल्यानंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त होत होती. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. गेली ११ वर्षे अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळलेले सपकाळ, मजुरी करून संसार सांभाळणारी पत्नी आणि शिक्षण अर्धवट सोडून कामाला लागलेला मुलगा अशी कुटुंबाची बिकट अवस्था आहे. याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी घेतली. 

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेत मदतीचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश चिवटे यांनी कोंढवली येथे भेट देत सपकाळ कुटुंबाच्या उपचारांची जबाबदारी स्वीकारली. यावेळी कुटुंबाला एक लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली, तसेच स्मारकासाठी पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. स्मारक पूर्ण होईपर्यंत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Gaurav Rakshe (@gaurav_ramesh_rakshe_official)

 


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!