Wai News – कोंढवली गावाचा अभिमान! एकाच वेळी दोन तरुणांची मुंबई पोलीस दलात निवड

वाई (Wai News ) तालुक्यातील कोंढवली गावाने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. गावातील शुभम दत्तात्रय चोरट आणि अनिकेत अशोक चोरट या दोन होतकरू तरुणांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे.

एकाच गावातील दोघांची एकाच वेळी पोलीस सेवेत निवड होणे ही अभिमानास्पद बाब असून संपूर्ण कोंढवली गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या या यशामुळे गावातील तरुणांना नवी प्रेरणा मिळाली आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या दोघांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांकडून व नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुंबई पोलीस दलात सेवा देण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आपल्या कुटुंबासह गावाचे नावही उज्ज्वल केले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment

error: Content is protected !!