Wai News – आईच्या कष्टांची शिदोरी अन् वडिलांचं स्वप्न… बोरगांवच्या आनंद वाडकरची भारतीय लष्करात निवड

वाई (Wai News) तालुक्यातील बोरगांव बुद्रुक येथील कु. आनंद अर्चना यशवंत वाडकर यांची भारतीय लष्करामध्ये निवड झाल्याने संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. लहानपणीच पित्याचे छत्र हरवल्यानंतर त्यांच्या आईने प्रचंड मेहनत आणि त्याग करत मुलांना शिक्षण दिले. अत्यंत कठीण परिस्थितीतही आनंदने हार न मानता जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर हे यश मिळवले आहे.

ग्रामस्थ मंडळ बोरगांव बुद्रुक तसेच मुंबई मंडळाचे सदस्य कै. यशवंत वाडकर पाटील यांचे चिरंजीव असलेल्या आनंदने आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव उंचावले आहे. लष्करात जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने नियमित सराव, शारीरिक तयारी आणि अभ्यास यांचा समतोल राखला. त्याच्या या यशामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असून, अनेक तरुणांसाठी तो प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. गावकऱ्यांकडून त्याचे विशेष कौतुक होत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!