Wai News – मुंबईत अवतरणार बोरगांव! क्रिकेटच्या मैदानावर गावपणाचा जिव्हाळा; ‘बोरगांव प्रीमियर लीग पर्व 3’चा रणसंग्राम

धावपळीच्या, स्वप्नांच्या आणि संघर्षांच्या या जगात शिक्षणामुळे किंवा कामानिमित्त गावापासून लांब शहरांमध्ये येऊन रहाव लागतं. गाव दुरावलं असलं तरी मुंबई-पुण्यात राहूनही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आपलं गाव (Wai News) सतत आठवत असतं. ती गावाप्रती असणारी ओढ कधी कमी होत नाही. पण जेव्हा मुंबईसारख्या महानगरात संपूर्ण गाव एकत्र येतं, तेव्हा काही काळासाठी मनातली मुंबई नाहीशी होते आणि हृदयाच्या पटलावर गाव अवतरतं. असाच काहीचा अनुभव बोरगांवकर 26 जानेवारी 2026 रोजी घेणार आहेत. 

kenjalgad fort – वाईचा केंजळगड, छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे नामकरण केले होते

भैरवनाथ युवा मंडळ, बोरगांव बुद्रुक यांच्या वतीने आयोजित श्री काळभैरवनाथ चषक 2026 – बोरगांव प्रीमियर लीग पर्व 3 हा त्याच गावपणाचा उत्सव ठरणार आहे. सोमवार, 26 जानेवारी 2026 रोजी कै. लक्ष्मीबाई मुंबईकर मैदान, स्वामी समर्थ मठाजवळ, सेक्टर 22, जुईनगर, नवी मुंबई येथे हा गावांतर्गत क्रिकेट रणसंग्राम रंगणार आहे. या स्पर्धेत 8 संघमालक, 120 खेळाडू सहभागी होणार असून हे खेळाडू फक्त क्रिकेटपटू नाहीत, तर एकमेकांचे मित्र, भाऊ, काका, नातेवाईक आहेत.

कमळगड किल्ला/Kamalgad fort Information In Marathi

पोटाची खळगी भरण्यासाठी वेगवेगळ्या शहरांत विखुरलेली ही माणसं, क्रिकेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकाच छत्राखाली, एकाच मैदानावर एकमेकांना भिडण्यासाठी एकत्र येत आहेत. हा सामना केवळ धावा, विकेट्स किंवा ट्रॉफीचा नाही, तर नात्यांचा, आठवणींचा आणि गावाच्या मातीशी असलेल्या नात्याचा आहे. बोरगांव प्रीमियर लीग म्हणजे क्रिकेटपेक्षा मोठा, गाव जोडणारा उत्सव ठरणार आहे. 

Wai – वाईमधील टॉप 10 पर्यटन स्थळे; नृसिंह मंदिर ते वैराटगड, एकदा अवश्य भेट द्या

error: Content is protected !!