Wai News – वाई तालुक्यात हव्वा कोणाची? मकरंद (आबा) पाटील की मदन भोसले?

वाई (Wai News ) तालुक्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. अनेक वर्षे वाई मतदारसंघात मकरंद (आबा) पाटील यांचा दबदबा असल्याचं चित्र होतं. मंत्रिपद, जिल्हा बँक आणि राज्यसभेची ताकद यामुळे त्यांना तोलामोलाचा विरोधक उरलेला नाही, अशी चर्चा होती. मात्र नगरपालिका निवडणुकीत या चर्चांना पुर्नविरान बसल्याची चर्चा तालुक्यात रंगतीये. 

वाई नगरपालिका निवडणुकीत मदन भोसले आणि डॉ. सुरभी भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मिळवलेलं यश सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरलं आहे. गावोगावी दौरे, लोकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा आणि भाजपची संघटनात्मक ताकद यामुळे भोसले गट पुन्हा मैदानात उतरल्याचं स्पष्ट झालं आहे. याच काळात जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील यांच्यातील शीतयुद्धाचाही भाजपला फायदा झाल्याचे बोलले जाते.

जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील यांच्यातील शीतयुद्ध, राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूती, या सगळ्या घटकांचा परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर होणार आहे. त्यामुळे लढत चुरशीची होणार, अशी चर्चा तालुक्यात आहे.

error: Content is protected !!