Wai News – सुरूर ते वाई रस्ता 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार? मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

महाबळेश्वर–पाचगणी परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याने मंत्रालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सुरूर ते वाई (Wai News) हा रस्ता ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना दिले. तसेच महाबळेश्वरपाचगणी मार्गावरील खड्डेमय रस्त्यांवर तातडीने पॅचवर्क करून ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

सुरूर ते पोलादपूर मार्गावरील सुरू असलेल्या रस्ते विकासकामांची प्रगती, कामाचा दर्जा आणि उर्वरित कामांचे नियोजन यावरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. काही दिवसांपूर्वी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेविरोधात महाबळेश्वर, वाई आणि पाचगणी परिसरातील नागरिकांनी बंद पाळून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर शासनाने या प्रश्नाची दखल घेत बैठक घेऊन अधिकाऱ्यांना कामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!