Aviation Course म्हणजे काय रे? 12वी नंतरचे Aviation Courses, Fees आणि Career ची सर्व माहिती एका क्लिकवर

Aviation Industry हा शब्द मी पहिल्यांदा एका वृत्तपत्रामध्ये वाचला आणि त्यानंतर Aviation Industry बद्दल माहिती जाणून घेण्यासाठीचा माझा शोध सुरू झाला. Aviation Course सारखे कोर्स असतात, याची कल्पना मला माझं शिक्षण सुरू असताना अजिबात नव्हती. जसजस वाचन वाढत गेलं तसतस वेगवेगळ्या कोर्सबद्दल माहिती मिळत गेली शिक्षणाच्या विस्ताराची जाणीव झाली. त्यामुळे लिखाणाच्या माध्यमातून अशाच विविध कोर्सेसची माहिती होत गेली. त्यातलाच हा एक Aviation Course ज्याची माहिती आपण या ब्लॉगमध्ये सविस्तर घेणार आहोत. 

मागील काही वर्षांमध्ये सोशल मीडियामुळे बरीच प्रगती झाली आहे. अनेक कोर्सेसची माहिती विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर टाईंंमपास करता करता मिळत आहे. Aviation Industry सुद्धा या सर्व वेगवान युगात झपाट्याने वाढत आहे. नुकतेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झालं. भविष्यात देशात आणि विदेशात विमानतळांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. विमानतळांची वाढ म्हणजे साहजिकच विमानप्रवासामध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होणार. त्यामुळे Aviation Course करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. याच अनुषंगाने आपण या ब्लॉगमध्ये What Is Aviation Couse, Aviation Courses After 12th, Aviation Management Course आणि Aviation Course Fees याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

Aviation Course म्हणजे काय? | What is Aviation Course 

Aviation Course चा साधा सरळ अर्थ म्हणजे विमानसेवा, विमानतळ व्यवस्थापन, एअरलाईन्स ऑपरेशन्स, सुरक्षा व्यवस्था, ग्राहक सेवा आणि व्यवस्थापन यांच्याशी संबंधित अभ्यासक्रम. हे कोर्स विद्यार्थ्यांना एअरलाईन, एअरपोर्ट, कार्गो, ग्राउंड स्टाफ, केबिन क्रू किंवा मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्यासाठी तयार करतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवासाची आवड आहे, काहीतरी भन्नाट करण्याची तयारी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स एखाद्या पर्वणीसारखा आहे.  सोप्या भाषेत सांगायचं तर, Aviation Course म्हणजे विमान उद्योगातील प्रोफेशनल करिअरसाठी आवश्यक प्रशिक्षण.

Cyber Security Course Information In Marathi – सायबर सुरक्षा कोर्स

Aviation Courses कोणते असतात?

 विद्यार्थ्यांची आवड, पात्रता आणि भविष्यातील उद्दिष्टांनुसार कोर्स निवडण्याची तुम्हाला मुभा आहे. सध्याच्या घडीला विविध प्रकारचे aviation courses उपलब्ध आहेत. जसे की, 

  • Diploma in Aviation
  • Certificate in Aviation
  • Airport Management Course
  • Cabin Crew / Air Hostess Course
  • Ground Staff Training
  • BBA in Aviation
  • MBA in Aviation Management

12वी नंतरचे Aviation Courses | Aviation Courses After 12th  

कला, वाणिज्या किंवा विज्ञान कोणत्याही शाखेतून तुम्ही जर 12 वी उत्तीर्ण केली असेल, तर तुम्ही पुढील कोर्सेस करू शकता. 

  • Diploma in Aviation & Hospitality
  • Airport Management Course
  • Cabin Crew / Ground Staff Course
  • BBA in Aviation Management

पात्रता

  • 12वी उत्तीर्ण
  • चांगले संवाद कौशल्य (English आवश्यक)
  • काही कोर्ससाठी उंची, फिटनेस आणि वयाचे निकष लागू होतात

Photography Courses Online – फोटोग्राफी आणि ग्राफिक डिझाईनमध्ये आहे भविष्य, जाणून घ्या सविस्तर…

Aviation Management Courses बद्दल माहिती

ज्यांना व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी Aviation Management Courses हा उत्तम पर्याय आहे. या कोर्समध्ये विमानतळ आणि एअरलाईनच्या व्यवस्थापनाशी संबंधित विषय शिकवले जातात. यामध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश आहे? चला जाणून घेऊया.

  • Airport Operations
  • Airline & Fleet Management
  • Aviation Safety & Security
  • Customer Service Management
  • Cargo & Logistics Management

लोकप्रिय Aviation Management Courses:

  • BBA in Aviation Management
  • MBA in Aviation Management

Aviation Course ची फी किती असते? | Aviation Course Fees 

Aviation course काय आहे आणि कोर्समध्ये कोणकोणते विषय आहेत, याची माहिती तुम्हाला आता झाली असेल. आता पुढचा टप्पा म्हणजे हा कोर्स करण्यासाठी पैसे किती मोजावे लागणार. तर fees ही कोर्सचा प्रकार, कालावधी आणि कॉलेजवर अवलंबून असते आणि त्यानुसार Fees मध्ये बदल होतो. 

अंदाजे Aviation Course Fees:

  • Certificate / Diploma Course: ₹50,000 ते ₹1,50,000
  • BBA in Aviation: ₹1,50,000 ते ₹3,00,000 (पूर्ण कोर्स)
  • MBA in Aviation Management: ₹2,00,000 ते ₹5,00,000

प्रवेश घेण्यापूर्वी कॉलेजची मान्यता, प्लेसमेंट सपोर्ट आणि रेकॉर्ड तपासणे आवश्यक आहे आणि आवर्जून वेळ काढून सर्व गोष्टी तपासून घ्या. 

Aviation Course नंतर करिअरच्या संधी

Aviation Courses पूर्ण केल्यानंतर खालील पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध होतात:

  • Airline Ground Staff
  • Cabin Crew / Air Hostess
  • Airport Operations Executive
  • Customer Service Officer
  • Aviation Manager
  • Cargo & Logistics Executive

भारताबरोबरच परदेशातही Aviation Industry मध्ये मोठी मागणी आहे.

जर तुम्हाला विमानसेवा, प्रवास, व्यवस्थापन आणि ग्लोबल करिअर यामध्ये रस असेल, तर Aviation Course हा भविष्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. योग्य माहिती, योग्य संस्था आणि योग्य कोर्सची निवड केल्यास Aviation क्षेत्रात यशस्वी करिअर घडवता येते. तर वाट कसली पाहताय माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर आतापासूनच तयारीला सुरुवात करा. 

error: Content is protected !!